प्रसंगी मोदी आपले मतही बदलतात..
By admin | Published: August 31, 2014 03:18 AM2014-08-31T03:18:03+5:302014-08-31T03:18:03+5:30
जिद्द, चिकाटी आणि नावीन्यपूर्ण कल्पना व त्यांच्या अंमलबजावणीचा ध्यास हे गुण. त्यांच्यासोबत काम करण्याचा आनंद म्हणूनच वेगळा आहे.
Next
मोदी हे जरा जास्तच शिस्तप्रिय आहेत. सहकारी मंत्री आणि नोकरशाहीला या करडय़ा शिस्तीचा जाच होतो, असे नाही का वाटत?
निर्णय तातडीने घेतले नाहीत आणि त्याची आग्रहपूर्वक अंमलबजावणी केली नाही तर मग आधीच्या आणि आमच्या सरकारमध्ये काय फरक राहील? आम्हीही संथगतीने चाललो तर उद्या तुम्हीच लिहिणार की आम्ही ढिम्म आहोत. या देशाला गतिमान कारभाराची आणि परिणामकारक प्रशासनाची नितांत आवश्यकता आहे. ते मोदी करीत असल्याचा नागरिकांना आनंदच आहे. अशी शिस्त आवश्यकच असल्याची देशात भावना आहे. ‘पाहून सांगतो अन् सांगून पाहतो’ ही नोकरशाहीची प्रवृत्ती बदलली पाहिजे. लोककल्याणासाठी शिस्त गरजेची आहे.
मोदी यांच्या नेतृत्वात ‘अच्छे दिन कब आनेवाले हैं?’ असे विरोधक विचारत आहेत. ते कधी येतील?
विरोधकांसाठी आणखी बरीच वर्षे अच्छे दिन येण्याची शक्यता नाही! विरोधकांचे ‘बुरे दिन’ सुरू असल्याने त्यांना चांगले काही दिसत नाही. मोदी यांनी अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला आहे. प्रलंबित योजना, कामांना गती दिली आहे. त्याचे चांगले परिणाम वर्षभराच्या आत दिसतील. आधीच्या आणि आताच्या सरकारमधील सर्वात मूलभूत बदल म्हणजे जनतेच्या प्रश्नांप्रति या सरकारमध्ये संवेदनशीलता आहे. तोच मोदी यांच्या कामकाजाचा मुख्य आधार आहे.
महाराष्ट्राच्या दृष्टीने या 1क्क् दिवसांत कुठले महत्त्वाचे निर्णय घेता आले?
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आम्ही करणार आहोत. मराठवाडय़ाचा औद्योगिक अनुशेष दूर करण्यास औरंगाबादमध्ये
ड्रायपोर्ट बांधले जाईल. नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. नवी मुंबई विमानतळ लवकरच मार्गी लागेल. आळंदी-पुणो-पंढरपूर व देहू-पुणो-पंढरपूर या दोन मार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेतला. मुंबई पोर्ट
ट्रस्टचे पुनरुज्जीवन करणार. ट्रस्टची एक इंचही जमीन बिल्डरच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही. देशातील बंदरांचा सामूहिक विकास ‘सागरमाला’ योजनेद्वारे केला जाईल.
मोदी यांचे पंतप्रधान म्हणून कुठले गुण आपल्याला भावतात?
जिद्द, चिकाटी आणि नावीन्यपूर्ण कल्पना व त्यांच्या अंमलबजावणीचा ध्यास हे गुण. त्यांच्यासोबत काम करण्याचा आनंद म्हणूनच वेगळा आहे.
गडकरी म्हणतात..
महत्त्वाचे निर्णय घेताना पंतप्रधान मोदी आपले सहकारी व मंत्र्यांशी चर्चा करतात. त्यांनी प्रतिकूल मत दिले तरी त्याचा सन्मान करतात़ एवढेच नव्हे तर प्रसंगी आपले मतही बदलतात, असा आपला अनुभव असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज वाहतूक आणि ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. मोदी यांच्या पंतप्रधानपदाला 1क्क् दिवस पूर्ण होत असताना, त्याबाबत नितीन गडकरी यांच्याशी ‘लोकमत’चे प्रतिनिधी
यदु जोशी यांनी केलेली बातचीत.