अमेरिकेशी बळकट संबंधांची मोदींची ग्वाहीट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 04:41 AM2019-06-27T04:41:24+5:302019-06-27T04:42:00+5:30
अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय संबंधांतून आर्थिक, व्यापार, ऊर्जा, संरक्षण, दहशतवादविरोधात उपाययोजना आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क बळकट करण्याची बांधिलकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
नवी दिल्ली : अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय संबंधांतून आर्थिक, व्यापार, ऊर्जा, संरक्षण, दहशतवादविरोधात उपाययोजना आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क बळकट करण्याची बांधिलकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी बुधवारी मोदी यांची येथे भेट घेतल्यावर मोदी यांनी उभय देशांची व्यूहरचनात्मक भागीदारी कशी असेल याचा दृष्टिकोन मांडला.
मोदी यांनी अमेरिकेसोबतच्या संबंधांना असलेल्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला आणि सरकारच्या नव्या कारकीर्दीत व्यूहरचनात्मक भागीदारीबद्दलचा आपला दृष्टिकोन सांगितला, असे पंतप्रधान कार्यालयाने निवेदनाद्वारे सांगितले.
पोम्पिओ यांनी भारतासोबतचे संबंध अधिक बळकट करण्यात ट्रम्प सरकारचे हित कसे आहे हे आणि सामायिक दृष्टिकोन व ध्येये साध्य करण्यासाठी एकत्र काम करण्यातील महत्त्व व्यक्त केले, असे त्यात
म्हटले.