मोदींची आश्वासने केवळ ‘हवाबाजी’
By Admin | Published: September 9, 2015 02:57 AM2015-09-09T02:57:32+5:302015-09-09T08:19:30+5:30
मोदींनी निवडणूक प्रचाराच्या वेळी दिलेली आश्वासने केवळ ‘हवाबाजी’ आणि निवडणूक जुमला असल्याचे सिद्ध झाले आहे. वास्तविकतेचे भान नसलेल्या रालोआ सरकारने अपयश
नवी दिल्ली : मोदींनी निवडणूक प्रचाराच्या वेळी दिलेली आश्वासने केवळ ‘हवाबाजी’ आणि निवडणूक जुमला असल्याचे सिद्ध झाले आहे. वास्तविकतेचे भान नसलेल्या रालोआ सरकारने अपयश झाकण्यासाठी केवळ सारवासारव चालविली आहे, या शब्दांत सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारवर जोरदार प्रहार केला.
राहुल गांधी यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मोहीम छेडल्यामुळेच भूसंपादन विधेयकाबाबत सरकारला माघार घेणे भाग पडले. त्याचे श्रेय पूर्णपणे कार्यकर्त्यांना देतानाच त्यांनी कामगार सुधारणा, महिला आणि बालकल्याण, माहिती अधिकार कायदा आणि मनरेगासारख्या योजनांसाठीही सरकारविरुद्ध
अशाच पद्धतीचे आंदोलन पुकारण्याचे आवाहन केले. मोदींनी मीडिया इव्हेंटस्ला महत्त्व देत
घोषणा दिल्या; मात्र त्यांना
शब्द पाळता आलेला नाही. हेडलाईन्स देण्यावर जोर दिला, पण प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्तता केलेली नाही.
गेल्या आठवड्यात दिल्लीत रा.स्व.संघ आणि संलग्न १५ संघटनांची बैठक झाली.
दुष्काळ आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
देशाच्या विविध भागात दुष्काळाची स्थिती आहे. शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडला आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस किंवा पाऊसच नसल्यामुळे पिके नष्ट झाली आहेत. मोदी सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील बनले आहे.
कलबुर्गी, पानसरेंचा उल्लेख
पुरोगामी विचारवंत आणि लेखकांना जीवानिशी संपवले जात आहे, असे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षपणे अलीकडेच हत्या झालेल्या डॉ. एम.एम. कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला.