विरोधकांच्या महाआघाडीतून महाभेसळीचे सरकार येणार, छत्तीसगडमधील सभेत मोदींची काँग्रेसवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 05:49 AM2019-02-09T05:49:30+5:302019-02-09T05:50:00+5:30
लोकसभा निवडणुकांत आम्हाला निवडून न दिल्यास विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे जे सरकार येईल, ते महाभेसळीचे येईल. या महाभेसळीपासून जनतेने लोकांनी सावध राहावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हणाले.
रायपूर - लोकसभा निवडणुकांत आम्हाला निवडून न दिल्यास विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे जे सरकार येईल, ते महाभेसळीचे येईल. या महाभेसळीपासून जनतेने लोकांनी सावध राहावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हणाले.
भाजपाला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी महाआघाडीची जी सुरुवात केली आहे, त्याची खिल्ली मोदी यांनी छत्तीसगढमधील सभेत उडविली. या राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसने भाजपाचा दणदणीत पराभव केला होता. मोदी म्हणाले की, गांधी घराण्यातील तसेच काँग्रेसमधील बहुतांश नेते एक तर जामीन मिळाल्यामुळे बाहेर आहेत किंवा अटकपूर्व जामिनासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. (वृत्तसंस्था)
घोटाळेबाजांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा
पोलीस आयुक्तांच्या चौकशीच्या विरोधात ममता बॅनर्जी धरणे धरून बसल्या होत्या, याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, घोटाळेबाजांची बाजू घेऊ न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आंदोलन करावे, ही लाजिरवाणी बाब आहे; पण चिट फंडमधील घोटाळेबाजांना हा चौकीदार कदापि मोकळे सोडणार नाही.