गुलाम अली व कसुरी वादावरील मोदींचे विधान दुर्भाग्यपूर्ण - शिवसेना
By admin | Published: October 14, 2015 01:27 PM2015-10-14T13:27:31+5:302015-10-14T18:19:40+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुलाम अली व कसुरी यांच्या कार्यक्रमाच्या वादांना दुर्दैवी म्हणत असतील तर ही दुःखद बाब आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - गोध्रा व अहमदाबादमधील घटनांमुळे जगभरात ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुलाम अली व कसुरी यांच्या कार्यक्रमाच्या वादांना दुर्दैवी म्हणत असतील तर ही दुर्भाग्यपूर्ण बाब आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये दादरीतील हत्या व गुलाम अलींचा कार्यक्रमाचा वाद या घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. मोदींच्या या विधानावरुन विरोधी पक्षांसह मित्रपक्षातील नेत्यांनीही यावर टीका केली आहे. मोदींचे हे विधान त्यांचे वैयक्तिक वाटत नाही तर पंतप्रधानपदाचे वाटते असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर संघ व भाजपाचे मित्र पक्ष हे नरेंद्र मोदींना गोध्रातील 'हिरो' मानतात असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केला आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान असून जनतेला उत्तर देण्यास ते बांधील आहेत. दादरीतील घटनेने देशाच्या भावनांना हादरा बसला असून आता नरेंद्र मोदींची घरवापसी होणार असे खान यांनी म्हटले आहे. तर मोदींनी दादरीतील घटनेवर मौन सोडण्यास थोडा उशीरच केला असा टोला नितीशकुमार यांनी लगावला आहे.