मोदींची चहाची टपरी होणार टुरिस्ट स्पॉट

By Admin | Published: July 4, 2017 10:09 AM2017-07-04T10:09:02+5:302017-07-04T10:31:51+5:30

ज्या चहाच्या टपरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लहान असताना चहा विकायचे तो स्टॉल लवकरच पर्यटन स्थळ बनणार आहे.

Modi's tea tour will be a tourist spot | मोदींची चहाची टपरी होणार टुरिस्ट स्पॉट

मोदींची चहाची टपरी होणार टुरिस्ट स्पॉट

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि. 4- गुजरातच्या वडनगर स्टेशनवरील ज्या चहाच्या टपरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लहान असताना चहा विकायचे तो स्टॉल लवकरच पर्यटन स्थळ बनणार आहे. त्या चहाच्या टपरीला पर्यटन स्थळ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे वडनगरमधील  चहाच्या टपरीला आता लवकरच नवं रूप मिळणार आहे. यामुळे गुजरातमध्ये फिरायला जाणाऱ्या लोकांच्या पर्यटन स्थळांच्या यादीत या नव्या स्थळाची भर पडणार आहे. 
 
2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मोदींनी प्रचाराच्यावेळी लहानपणी ते विकत असलेला चहा आणि चहाची टपरी या सगळ्या आठवणी जागविल्या होत्या. "गुजरातमधील वडनगर रेल्वेस्थानकात एक चहाची टपरी असून, लहानपणी याच चहाच्या टपरीवर नरेंद्र मोदी हे चहाविक्री करत होते, असं सांगितलं जातं. ही टपरी पर्यटनस्थळ म्हणून विकसीत करण्यात येईल’, अशी माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी दिली. रविवारी गांधीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत महेश शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.  मोदींच्या या चहाच्या टपरीचा विकास करताना जुन्या गोष्टीला हात लावला जाणार नाही, ते तसंच ठेवलं जाइल, असंही शर्मा यांनी सांगितलं आहे. 
 
सोमवारी पत्रक जारी करून वडनगर स्टेशनचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाणार असेल, तरीही मोदींच्या चहाच्या टपरीला आधुनिक रूप दिलं जाणार नाही, असं शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे.  ‘वडनगर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जन्मगाव आहेच, पण त्याचबरोबर या गावात शर्मिष्ठा तलावासह इतरही काही महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणं आहेत’, असंही शर्मा म्हणाले आहेत.
 
दरम्यान, नरेंद्र मोदी आपल्या लहानपणी ज्या स्टेशनवर चहा विकायचे त्या "वडनगर रेल्वे स्टेशनलासुद्धा  एक नवं रुप दिलं जाणार आहे. त्यासाठी सरकारकडून 8 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, वडनगर रेल्वे स्टेशनचा विकास करण्यासाठी जवळपास 8 कोटी रुपये स्वीकारण्यात आले आहेत.  2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा "वडिलांसोबत वडनगर स्टेशनवर चहा विक्री केली", असा उल्लेख केला आहे.  ही पंतप्रधान मोदींची जन्मभूमीदेखील आहे. 
 

Web Title: Modi's tea tour will be a tourist spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.