चाहत्यांनी बांधले मोदींचे मंदिर
By admin | Published: February 11, 2015 11:19 PM2015-02-11T23:19:32+5:302015-02-11T23:19:32+5:30
राजकोट : दिल्लीवासीयांनी भलेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाकारले असेल, पण राजकोटमधील चाहत्यांसाठी मात्र ते आजही देव आहेत. त्यांच्या भक्तीत गेल्या अनेक वर्षांपासून खंड पडलेला नाही. या चाहत्यांनी चक्क मंदिर बांधून त्यात मोदींची मूर्ती बसवत श्रद्धेचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. या मंदिराचे १६ फेब्रुवारी रोजी लोकार्पण होत आहे.
Next
र जकोट : दिल्लीवासीयांनी भलेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाकारले असेल, पण राजकोटमधील चाहत्यांसाठी मात्र ते आजही देव आहेत. त्यांच्या भक्तीत गेल्या अनेक वर्षांपासून खंड पडलेला नाही. या चाहत्यांनी चक्क मंदिर बांधून त्यात मोदींची मूर्ती बसवत श्रद्धेचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. या मंदिराचे १६ फेब्रुवारी रोजी लोकार्पण होत आहे.एखाद्या जिवंत व्यक्तीचे गुजरातमधील हे पहिलेच मंदिर आहे, असे ओम युवा ग्रुपचे नेते जयेश पटेल यांनी म्हटले. मोदींच्या ३५० चाहत्यांच्या गटाने वर्गणी गोळा करून हे मंदिर बांधले असून, त्यांची दररोज पूजा केली जाणार आहे. राजकोटमधून पहिल्यांदा निवडणूक लढवीत मोदी मुख्यमंत्री बनल्यापासून हा गट त्यांना देव मानून पूजा करीत आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान म्हणून केलेल्या कार्यामुळे प्रभावित होऊन आम्ही मंदिर बांधले आहे. या मंदिरावर सात लाख रुपये खर्च आला असून, त्यातील मूर्ती १.७ लाख रुपयांची आहे. आधी आम्ही त्यांचा फोटो ठेवला होता. कोठारिया ग्रामपंचायतने दहा वर्षांपूर्वी धार्मिक कार्यासाठी ३५० चौ. फुटाचा भूखंड दिला होता. त्या जागेवर मंदिर उभे राहिले आहे. आता हे गाव राजकोट महापालिकेच्या क्षेत्रात आले आहे, अशी माहिती पटेल यांनी दिली.