मोघे, राऊत, चतुर्वेदी यांना हवी स्वतंत्र ‘विदर्भ काँग्रेस’! प्रदेशाध्यक्षांना दिले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:43 AM2018-01-04T03:43:32+5:302018-01-04T03:43:51+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सुरू असताना कॉँग्रेसच्या भूमिकेनुसार तोंडावर बोट ठेवणाºया काँग्रेसच्या नेत्यांना स्वतंत्र ‘विदर्भ काँग्रेस’ मात्र हवी आहे. माजी मंत्री नितीन राऊत हे आज गुरुवारी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेत आहेत.

Moghe, Raut, Chaturvedi want separate 'Vidarbha Congress'! Letter given to the State President | मोघे, राऊत, चतुर्वेदी यांना हवी स्वतंत्र ‘विदर्भ काँग्रेस’! प्रदेशाध्यक्षांना दिले पत्र

मोघे, राऊत, चतुर्वेदी यांना हवी स्वतंत्र ‘विदर्भ काँग्रेस’! प्रदेशाध्यक्षांना दिले पत्र

Next

- विकास झाडे 
नवी दिल्ली -  स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सुरू असताना कॉँग्रेसच्या भूमिकेनुसार तोंडावर बोट ठेवणाºया काँग्रेसच्या नेत्यांना स्वतंत्र ‘विदर्भ काँग्रेस’ मात्र हवी आहे. माजी मंत्री नितीन राऊत हे आज गुरुवारी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेत आहेत.
कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याशी ह्यविदर्भ काँग्रेसह्ण स्वतंत्र व्हावी या संदर्भात विदर्भातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे. त्यात माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, नागपूरचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि माजी मंत्री नितीन राऊत यांचा समावेश होता. या तिघांनीही खा. चव्हाण यांना निवेदन दिले होते.
विदर्भ कॉँग्रेस का हवी?
यासंदर्भात अ‍ॅड. शिवाजीराव मोघे आणि नितीन राऊत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे विदर्भाकडे दुर्लक्ष झाले आहे. विदर्भात संघटन मजबुतीसाठी कोणताही कृती आराखडा नाही. विदर्भात भाजपचे खासदार आणि आमदारांची संख्या सर्वाधिक आहे.

Web Title: Moghe, Raut, Chaturvedi want separate 'Vidarbha Congress'! Letter given to the State President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.