मोहालीच्या पोलिस अधीक्षकांची संपत्ती १५२ कोटी
By admin | Published: April 15, 2016 12:26 PM2016-04-15T12:26:38+5:302016-04-15T12:26:38+5:30
पंजाब काँग्रेसचे केवल धिलॉंन आणि करण कौर ब्रारर हे पंजाब विधानसभेतील दोन श्रीमंत आमदार आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. १५ - पंजाब काँग्रेसचे केवल धिलॉंन आणि करण कौर ब्रारर हे पंजाब विधानसभेतील दोन श्रीमंत आमदार आहेत. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार धिलॉन यांची संपत्ती १३७ कोटी रुपये आणि करण ब्रारर यांची संपत्ती १२८ कोटी रुपये आहे. पण आता या दोघांवर पंजाब पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधीक्षक गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी मात केली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार गुरप्रीत सिंग भुल्लर यांची एकूण संपत्ती १५२ कोटी रुपये आहे. मोहालीचे सर्वाधिक काळ पोलिस अधीक्षकपद भूषवलेल्या भुल्लर यांच्या एकूण १६ मालमत्ता आहेत. त्यात आठ रहिवासी, चार शेती भूखंड आणि तीन व्यापारी मालमत्ता आहेत.
मध्य दिल्लीत बाराखंबा रोडवर ८५ लाखांचा व्यापारी भूखंड आहे. दिल्लीच्या पॉश सैनिक फार्म्सवर येथे १५०० स्कवेअरचा मोकळा भूखंड आहे. मोहालीत बरैली गावात त्यांनी सर्वाधिक ४५ कोटींची मालकीची जमिन दाखवली आहे. कागदपत्रांनुसार भुल्लर यांना जास्तीत जास्त मालमत्ता वडिलोपार्जित मिळाल्या आहेत.
२००९ ते २०१३ आणि २०१५ पासून आतापर्यंत भुल्लर मोहालीचे पोलिस अधीक्षक आहेत. पंजाबमधल्या १३० पेक्षा जास्त आयपीएस अधिका-यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.