Video - मोठी दुर्घटना! 50 फूट उंचीवरून खाली कोसळला आकाश पाळणा; 10 जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 12:23 PM2022-09-05T12:23:33+5:302022-09-05T12:29:58+5:30
जवळपास 50 फूट उंचीवरून हा आकाश पाळणा जमिनीवर पडला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दहा जण गंभीर जखमी झाले असून य़ामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
पंजाबमधील मोहाली येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होत. ड्रॉप टॉवरचा स्विंग तुटल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. जवळपास 50 फूट उंचीवरून हा आकाश पाळणा जमिनीवर पडला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दहा जण गंभीर जखमी झाले असून य़ामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात तसेच फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये 23 वर्षीय राजदीप सिंह, 31 वर्षीय हितेश कुमार, 28 वर्षीय झीनत आणि 23 वर्षीय भावना यांचा समावेश आाहे. ज्योती शर्मा (33), त्याची मुलगी मन्या शर्मा (13), सोनम (32), राजबीर ढाबरा (10), बनी वाधवा (12) यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी बहुतांश जणांच्या पाठीला आणि जबड्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
पंजाब के मोहाली में बड़ा हादसा हुआ है. अचानक किसी तकनीकी कारण के वजह से झूला सीधे नीचे गिर गया. जिसमें कई लोग घायल हो गए हैं. जिन्हें तुंरत अस्पताल में भर्ती कराया गया है. राहत की बात यह है कि हर कोई फिलहाल सुरक्षित है. #Accidents#Mohali#jhulaaccident#Punjabpic.twitter.com/jnaCrnPYp6
— Muskan Chaurasia (@banarasi_muskan) September 4, 2022
'लंडन ब्रिज' नावाचा हा महोत्सव 31 ऑगस्ट रोजी संपणार होता, परंतु तो 11 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला. आयोजक सनी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हे कसे घडले ते आम्ही शोधू. तांत्रिक समस्या होती असे दिसते. यापूर्वीही आम्ही अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, परंतु तसे झाले नाही. आम्ही पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करू." हा ड्रॉप टॉवर पाळणा अतिशय वेगाने फिरत होता.
अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने तो वेगात खाली आला. या अपघातात महिला आणि लहान मुले गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनास्थळी असलेल्या लोकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं. डीएसपी हरसिमरन सिंह यांनी सांगितले की, रविवार असल्याने खूप गर्दी होती. ही घटना कशी घडली हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच, या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.