मोहमुखला श्रमसंस्कार शिबिर
By admin | Published: December 25, 2015 11:53 PM2015-12-25T23:53:50+5:302015-12-25T23:54:00+5:30
अभोणा : पुणे विद्यापीठ व डांग सेवा मंडळ संचालित अभोणा कला विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत तालुक्यातील मोहमुख येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर झाले.
अभोणा : पुणे विद्यापीठ व डांग सेवा मंडळ संचालित अभोणा कला विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत तालुक्यातील मोहमुख येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर झाले.
१६ ते २२ डिसेंबर या कालावधीत झालेल्या या शिबिरास कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार, अभोण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कार्वेश कमलाकर, डांग सेवा मंडळाचे उपाध्यक्ष शंकराव मराठे, अभोणा जनता विद्यालयाचे प्राचार्य सुभाष देवघरे, मोहमुखचे सरपंच शिवदास साबळे, उपसरपंच विजय जाधव, डॉ. डी.ए. सोनवणे, चेतन हिरे, मुरलीधर जाधव, डॉ.डी.जे. नेरपगार, जितेंद्र सुर्वे, ॲड. मनोज सूर्यवंशी, प्रा. गणेश रूपवते, श्रीमती मीना पवार यांनी भेटी देऊन विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष शंकरराव मराठे होते. प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर कळवणचे तहसीलदार अनिल पुरे, शेखर जोशी, सरपंच शिवदास साबळे, विजय जाधव, रामदास पाटील, ग्रामसेवक बस्ते, सुनीता पवार आदि उपस्थित होते. उपसरपंच विजय जाधव यांनी शिबिर काळात राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.
प्रा. आर. एल. बोरा, पूजा तिसगे व अनिल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी.जी. बोरसे यांनी आभार मानले. महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी शिबिराचे संयोजन केले होते. (वार्ताहर)
-----