मोहम्मद शमीच्या पत्नीने मागितली तब्बल एवढी पोटगी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 04:08 PM2018-04-11T16:08:30+5:302018-04-11T16:08:30+5:30
भारताचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शमीवर विवाहबाह्य संबंध आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करणाऱ्या त्याच्या पत्नीने आता पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. शमीची पत्नी हसीन जहाँ हिने अलीपूरमधील न्यायालयात दावा दाखल करून दरमहा तब्बल...
कोलकाता - भारताचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शमीवर विवाहबाह्य संबंध आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करणाऱ्या त्याच्या पत्नीने आता पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. शमीची पत्नी हसीन जहाँ हिने अलीपूरमधील न्यायालयात दावा दाखल करून दरमहा 10 लाख रुपये एवढी पोटगी मिळण्याची मागणी केली आहे. दरम्यान, शमीविरोधात दाखल करण्यात आलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्यात अलीपूरच्या तिसऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी शमी आणि अन्य आरोपींना समन्स मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
हसीन जहाँनचे वकील झाकीस हुसैन यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की, दंडाधिकाऱ्यांनी आमची याचिका ऐकून दुसऱ्या पक्षाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार आहे. हसीन जहाँ मंगळवासी सकाळी कोर्टात आली. त्यानंतर तिने पती मोहम्मद शमी, त्याची आई अंजुमन आरा बेगम, बहीण सबीना अंजून, भाऊ मोहम्मद हबीब अहमद आणि हबीबची पत्नी शमा परवीन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली."
शमी हा दरवर्षी सुमारे 100 कोटींची कमाई करतो. त्यामुळे हसीन जहाँसाठी पोटगी देण्यात त्याला अडचण येऊ शतक नाही. कुटुंबाची काळजी घेणे हे शमीचे कर्तव्य आहे. त्यामुळे दहमहा सात लाख रुपये आणि मुलांसाठी तीन लाख रुपयांची मागणी आम्ही केली आहे, असेही वकिलांनी पुढे सांगितले. मोहम्मद शमीवर झालेल्या आरोपांप्रकरणी पोलिसांनी अमरोहा या शमीच्या गावी जाऊन चौकशी केली होती. मात्र अद्याप शमीची चौकशी करण्यात आलेली नाही.
आपल्या पतीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असून, त्याने आपल्याला मारहाणही केल्याचा सनसनाटी आरोप फेसबुक अकाऊंटवरून करत हसीन जहाँनने आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध चव्हाट्यावर आणले होते.