सीबीआयच्या चार अधिकाऱ्यांना मोईन कुरेशीने आणले अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 04:03 AM2018-10-26T04:03:12+5:302018-10-26T04:03:25+5:30

उत्तर प्रदेशातील मांस निर्यातदार याच्यामुळे केवळ सीबीआयचे संचालक आलोक वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थानाच नव्हे, तर आधीचे दोन संचालकही अडचणीत आले होते.

Moin Qureshi gets four officers from CBI | सीबीआयच्या चार अधिकाऱ्यांना मोईन कुरेशीने आणले अडचणीत

सीबीआयच्या चार अधिकाऱ्यांना मोईन कुरेशीने आणले अडचणीत

Next

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मांस निर्यातदार याच्यामुळे केवळ सीबीआयचे संचालक आलोक वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थानाच नव्हे, तर आधीचे दोन संचालकही अडचणीत आले होते. म्हणजेच वर्मा अस्थाना यांच्याबरोबरच रंजित सिन्हा व ए. पी. सिंह यांनाही मोईन कुरेशी प्रकरणाने फटका बसला होता. सीबीआयचे तीन संचालक व एक विशेष संचालक यांची प्रतिमा केवळ मोईन कुरेशीमुळेच डागाळली गेली.
डून स्कूल व नंतर स्टीफन्समून शिक्षण पूर्ण केलेला मोईन कुरेशी कानपूरचा आहे. त्याने २५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९३ साली रामपूर शहरात एक कत्तलखाना तयार केला. आज तो भारतातील सर्वात मोठा मांस निर्यातदार असून, आता त्याचे अनेक उद्योग आहेत. बांधकाम व फॅशन क्षेत्रातही मोईन कुरेशी सक्रिय आहे. त्याच्यावर भ्रष्टाचार, मनी लॉण्ड्रिंग व करचोरीचे अनेक आरोप आहेत. तसेच हवाला व्यवहारातही तो असल्याचा आरोप असून, राजकीय नेत्यांपासून सरकारी व सीबीआय अधिकाºयांना त्याने वेळोवेळी लाच दिल्याचे आरोपही मोईन कुरेशीवर झाले आहेत.
हा मोईन कुरेशी २०१४ मध्ये तब्बल ७० वेळा सीबीआयचे तत्कालीन संचालक रंजित सिन्हा यांना त्यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी भेटला होता. सिन्हा हे २०१२ ते २०१४ या काळात सीबीआयचे संचालक होते.
सध्याच्या वादात ज्या हैदराबादच्या सतीशबाबू सना या उद्योगपतीचे नाव समोर आले आहे, त्याने आपल्या मित्राच्या जामिनासाठी मोईन कुरेशीकडे एक कोटी रुपये तेव्हा दिले होते, असे ईडीच्या चौकशीत आढळून आले होते. विविध प्रकरणांत आरोप वा संशय असलेल्या इसमाला भेट दिल्याबद्दल रंजित सिन्हा यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले होते. सिन्हा यांनी त्यावेळी आपल्यावरील आरोप नाकारले होते; पण कुरेशी भेटीमुळे ते तेव्हा अडचणीत आले होते.
याच कुरेशीचे सीबीआयचे त्याआधीचे संचालक ए. पी. सिंह यांच्याशीही संबंध होते. सिंह हे २०१० ते २०१२ या काळात संचालक होते. कुरेशी व सिंह नेहमीच एकमेकांना मेसेजेस पाठवित असत. त्यानंतर ईडी तसेच प्राप्तिकर विभागाने त्या प्रकरणाचा तपास केला आणि गेल्या वर्षी सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपांमुळे लोकसेवा आयोगाचे सदस्यपद सोडण्याची वेळ ए. पी. सिंह यांच्यावर आली होती. त्यांनीही अर्थात रंजित सिन्हा यांच्याप्रमाणे आपल्यावरील आरोप अमान्य केले आहेत.
आलोक वर्मा यांनी कुरेशी प्रकरणात दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप राकेश अस्थाना यांनी केला, तर अस्थाना यांनी कुरेशीचा मित्र असलेल्या सतीशबाबू सना याच्याकडून तीन कोटी रुपयांची लाच घेतल्याची तक्रार आलोक वर्मा यांनी केली होती. त्यानंतर सीबीआयने अस्थाना यांच्या कार्यालयावर धाड घातली आणि दुसºया दिवशी देवेंद्र कुमार या अधिकाºयालाही अटक करण्यात आली.
>कशामुळे ठेवला संपर्क
एक तर या सर्व अधिकाºयांचा कधी ना कधी मोईन कुरेशी याच्याशी संबंध आला होता वा कुरेशी याने सीबीआय अधिकाºयांना अडचणीत आणण्यासाठी काही कारस्थाने केली होती, असे म्हणता येईल. देशातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित तपास यंत्रणेच्या अधिकाºयांना एक मांस निर्यातदार कसे अडचणीत आणू शकतो, याचे हे उदाहरणच आहे. अर्थात या अधिकाºयांनी त्याच्याशी संबंध का ठेवला, हाही सवालच आहे.

Web Title: Moin Qureshi gets four officers from CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.