सासर्‍याने केला सुनेचा विनयभंग वसंतवाडी-जळके येथील घटना : पीडितेच्या फिर्यादीवरून सासर्‍यासह सासूविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Published: April 19, 2016 12:49 AM2016-04-19T00:49:45+5:302016-04-19T00:49:45+5:30

जळगाव : स्नानगृहात आंघोळीसाठी गेलेल्या सुनेचा सासर्‍याने विनयभंग केल्याची घटना ९ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास वसंतवाडी-जळके (ता.जळगाव) येथे घडली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सासर्‍यासह सासूविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोघेही संशयित आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत.

Molestation of the daughter-in-law by her husband-in-law Vasantwadi-Jalke incident: On the plight of the victim, a case was registered against mother-in-law | सासर्‍याने केला सुनेचा विनयभंग वसंतवाडी-जळके येथील घटना : पीडितेच्या फिर्यादीवरून सासर्‍यासह सासूविरुद्ध गुन्हा दाखल

सासर्‍याने केला सुनेचा विनयभंग वसंतवाडी-जळके येथील घटना : पीडितेच्या फिर्यादीवरून सासर्‍यासह सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Next
गाव : स्नानगृहात आंघोळीसाठी गेलेल्या सुनेचा सासर्‍याने विनयभंग केल्याची घटना ९ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास वसंतवाडी-जळके (ता.जळगाव) येथे घडली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सासर्‍यासह सासूविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोघेही संशयित आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत.
याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ती घरातील स्नानगृहात आंघोळ करीत होती. त्याच वेळी तिचा सासरा स्नानगृहाजवळ आला. त्याने तिचा हात धरून विनयभंग केला. या प्रकाराला विरोध केल्यानंतर त्याने घरात कोणीही नाही, असे सांगून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरू असताना पीडितेची सासूदेखील त्याठिकाणी आली. तिनेही सासर्‍याला गैरप्रकार करण्यात मदत केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पीडितेने १८ एप्रिल रोजी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून दोन्ही संशयितांविरुद्ध भादंवि कलम ३५४, १०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर दोघेही संशयित आरोपी फरार झाले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक अहिरे करीत आहेत.

Web Title: Molestation of the daughter-in-law by her husband-in-law Vasantwadi-Jalke incident: On the plight of the victim, a case was registered against mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.