"आई, पार्टी देऊन टाका, तुमच्या मुलीचं 18 व्यांदा लग्न झालं..."; माधवी लता यांनी सांगितली मन हादरवून टाकणारी घटना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 01:51 PM2024-04-08T13:51:42+5:302024-04-08T13:55:29+5:30

Madhavi Latha : भरतनाट्यम डान्सर, सिंगर, कुशल वक्ता असण्याबरोबरच त्या सामाजिक कार्यकर्ताही आहेत. लोक त्यांना 'लेडी सिंघम'ही म्हणतात. ओवेसींवर हल्ला चढवताना, हैदराबादमध्ये आज देखील काहीही बदललेले नाही. बिचारे मुस्लीमही तेवढेच गरीब आहेत जेवढे हिंदू, असे माधवी म्हणतात.

Mom give the party, your daughter has done 18th wedding Madhavi Latha told hyderabad muslim girls story attacks asaduddin owaisi | "आई, पार्टी देऊन टाका, तुमच्या मुलीचं 18 व्यांदा लग्न झालं..."; माधवी लता यांनी सांगितली मन हादरवून टाकणारी घटना!

"आई, पार्टी देऊन टाका, तुमच्या मुलीचं 18 व्यांदा लग्न झालं..."; माधवी लता यांनी सांगितली मन हादरवून टाकणारी घटना!

भाजपने हैदराबादमध्ये माधवी लता (Madhavi Latha) यांना असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. यामुळे माधवी लता सध्या जबरदस्त चर्चेत आहेत. भरतनाट्यम डान्सर, सिंगर, कुशल वक्ता असण्याबरोबरच त्या सामाजिक कार्यकर्ताही आहेत. लोक त्यांना 'लेडी सिंघम'ही म्हणतात. ओवेसींवर हल्ला चढवताना, हैदराबादमध्ये आज देखील काहीही बदललेले नाही. बिचारे मुस्लीमही तेवढेच गरीब आहेत जेवढे हिंदू, असे माधवी म्हणतात. माधवी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यात, "15 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, मिडल ईस्टमधून एका मुलीने तिच्या आईला हैदराबादमध्ये फोन केला की, आई, जर पैसे असतील तर तुम्ही तेथे पार्टी देऊन टाका, तुमच्या मुलीचे 18 व्यांदा लग्न झाले आहे." अशी अक्षरशः मन हेलावणारी घटना त्यांनी सांगितली. 

हैदराबादमध्ये मुली विकल्या जातात? -
ओल्ड हैदराबादमध्ये माधवी लता असे का म्हणतात की, येथे मुली विकल्या जातात? यावर उत्तर देताना माधवी म्हणाल्या, "15 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, मिडल ईस्टमधून एका मुलीने तिच्या आईला हैदराबादमध्ये फोन केला की, आई, जर पैसे असतील तर तुम्ही तेथे पार्टी देऊन टाका, तुमच्या मुलीचे 18 व्यांदा लग्न झाले आहे. हे सत्य आहे. अरबस्तानात 16 वर्षांच्या मुलीचे 70 वर्षांच्या माणसासोबत लग्न होते. मुलगी तर मुलगीच असते,  धर्म कुठून आला? मलाही दोन मुली आहेत. मी महिनांना ओळखते." एवढेच नाही, तर आपली मुलगी चांगल्या आणि प्रतिष्ठित घरात जावी, तिचे चांगल्या मुलाशी लग्न व्हावे, ती शिक्षित असावी आणि तिचा संसार चांगला व्हावा, असे प्रत्येक आईला वाटते, असे  माधवी म्हणाल्या.

...2-4 वेळा लग्न करतात -
हैदराबादमध्ये पसमांदा मुस्लीम समाजाच्या अनेक गल्ल्या आहेत. त्यांचा आवाज चार भिंतीतून बाहेरही येत नाही. जे गरीबीमुळे 2-4 वेळा लग्न करतात. कारण यातून मिळणाऱ्या पैशांतून 7 ते 8 मुलांना भाकरी मिळते, असा दावा माधवी यांनी केला. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रूही आले.

मदरशांमध्ये अन्न पुरवतात माधवी -
माधवी लता या हैदराबादमधील अनेक मदरशांना मोफत अन्न आणि औषधेही पुरवतात. रोजा सुरू असताना त्या कपडे, अन्न आणि रेफ्रिजरेटरचीही व्यवस्था करतात. मात्र याच वेळी त्यांनी असाही दावा केला आहे की, ते (मुस्लीम समाजातील लोक) म्हणतात, आई कुणाला सांगू नका, कारण त्यांना धमक्या मिळतात. एवढेच नाही तर, येथे आलात तर पाय तोडू, असे मौलाना साहेब माझ्या टीम मेंबर्सना म्हणतात, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

माधवी लता यांचा अनेक मुस्लिम संघटना आणि ट्रस्टशी संबंध आहे. त्या मुस्लीम महिलांच्या संघटनांसोबत अनेक जनहिताची कामे करत आहेत. यामुळे, यावेळी ओवेसींचा दीड लाख मतांनी पराभव होईल, असा दावा त्यांनी केला आहे. महत्वाचे म्हणजे, आयबीचा रिपोर्ट आल्यानंतर, सरकारने माधवी लता यांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे.

Web Title: Mom give the party, your daughter has done 18th wedding Madhavi Latha told hyderabad muslim girls story attacks asaduddin owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.