MannKiBaat: दसऱ्याचा मुहूर्त! पंतप्रधान उद्या 'मन की बात' करणार
By हेमंत बावकर | Published: October 24, 2020 10:20 PM2020-10-24T22:20:45+5:302020-10-24T22:21:41+5:30
MannKiBaat : पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याला मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधतात. उद्याची मन की बात ही 70 वी असणार आहे. गेल्या महिन्यात त्यांनी 27 सप्टेंबरला मन की बात केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दसऱ्याचा मुहूर्त साधणार आहेत. रविवारी सकाळी 11 वाजता मोदी पर 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करणार आहेत. याबाबतची माहिती मोदींनी ट्विट करून दिली आहे.
Tune in at 11 AM tomorrow. #MannKiBaatpic.twitter.com/XJQhA8KaFs
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याला मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधतात. उद्याची मन की बात ही 70 वी असणार आहे. गेल्या महिन्यात त्यांनी 27 सप्टेंबरला मन की बात केली होती.
देशवासिय सकाळी 11 वाजता डीडी भारतीवर मोदींची मन की बात पाहू शकणार आहेत. याशिवाय ऑल इंडिया रेडिओवरही प्रादेशिक भाषांमध्ये ते ऐकवले जाणार आहे. यानंतर पुन्हा रात्री 8 वाजता पुन्हा प्रसारण केले जाणार आहे. मोदींची मन की बात 1922 हा नंबर डायल करूनही ऐकता येणार आहे. हा नंबर डायल केला की तुम्हाला एक फोन येणार आहे. त्यावर तुम्ही तुमची आवडीची भाषा निवडू शकता आणि मन की बात ऐकू शकता.
दरम्यान, मोदींच्या गेल्या काही भाषणांना डिसलाईक करण्याचे प्रमाण वाढले आहे. चार दिवसांपूर्वीच्या देशवासियांना केलेल्या संबोधनामध्ये युट्यूब चॅनेलवर डिसलाईक वाढल्याने भाजपाने ते बटनच डिसेबल केले होते. नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधात देशाची स्थिती चांगली असल्याचे सांगतानाच लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल, असे आवाहन देशवासियांना केले, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरू असतानाच ट्रोलिंगची भाजपाला वाटत होती. त्यामुळे पंतप्रधानांचे भाषण सुरू असतानाच भाजपाच्या पेजवर सुरू असलेल्या भाषणाच्या खालील डिसलाईकचे बटण बंद करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांसाठीचे संबोधन जेमतेम ५ ते १० मिनिटे चालले. ही अशी पहिलीच वेळ होती, जेव्हा मोदी एवढ्या कमी मिनिटांसाठी बोलले आहेत