क्षण अभिमानाचा ! 'चांद्रयान 2' मोहिमेचं नेतृत्व करतेय 'रॉकेट वुमन रितु'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 08:27 PM2019-07-14T20:27:07+5:302019-07-14T20:29:48+5:30

चांद्रयान 2 जेव्हा चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, तेव्हा 130 कोटी भारतीयांसाठी हा क्षण अभिमानाचा असणार आहे.

Moments of pride! 'Chandrayaan 2' is leading the campaign 'Rocket Woman Ritu karidhal shrivastav' | क्षण अभिमानाचा ! 'चांद्रयान 2' मोहिमेचं नेतृत्व करतेय 'रॉकेट वुमन रितु'

क्षण अभिमानाचा ! 'चांद्रयान 2' मोहिमेचं नेतृत्व करतेय 'रॉकेट वुमन रितु'

googlenewsNext

नवी दिल्ली - भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारताचे हे यान चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास चंद्रावर उतरणारा भारत हा जगातला चौथ्या क्रमांकाच देश ठरणार आहे. जगाचे लक्ष लागलेल्या या चांद्रयान 2 मोहिमेचं नेतृत्व एक महिला करत आहे. त्यामुळे महिलाशक्तीचाही अभिमान या मोहिमेसह जोडला गेलेला आहे. 

चांद्रयान 2 जेव्हा चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, तेव्हा 130 कोटी भारतीयांसाठी हा क्षण अभिमानाचा असणार आहे. मात्र, उत्तर प्रदेश आणि विशेषत: लखनौवासियांसाठी हा क्षण अत्यानंदाचा असेल. कारण, इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लखनौ कन्या रितु करिधाल श्रीवास्तव या मिशन चांद्रयान 2 च्या डायरेक्टर आहेत. मला नेहमीच ग्रह-ताऱ्यांचं आकर्षण राहिलं आहे. ताऱ्यांनी मला नेहमीच आपल्याकडे ओढलं आहे. अवकाशातील त्या अंधाऱ्या जगात काय असेल? याची उत्सुकता मला बालपणापासून होती. त्यामुळे विज्ञान हे माझ्यासाठी केवळ विषय नसून एक जुनून असल्याचे रितु करिधाल यांनी म्हटलं आहे. रितु यांनी इस्रोमध्ये अनेक महत्त्वांकाक्षी प्रकल्पांवर काम केलं आहे. चांद्रयान 2 या मोहिमेकडे जगभराचे लक्ष लागले असून देशातील 130 कोटी भारतीयांचाही उत्साह या प्रकल्पासोबत जोडला गेला आहे. आमच्याजवळ कुठलाही अनुभव नव्हता, पण सर्व शास्त्रज्ञांची टीम दिवस-रात्र मेहनत घेत होती. त्यांच्या अनुभवातूनच आम्हे हे मिशन करुन दाखवलं, असेही रितु यांनी सांगितलं. 

रितु या लखनौच्या राजाजीपुरम येथील रहिवासी आहेत. रितु यांच्या आई-वडिलांचे निधन झाले असून त्याचे भाऊ रोहित यांनी आपल्या बहिणीचा अभिमान असल्याचे म्हटले. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन रितु यांनी केले आहे. 

रितु करिधाल श्रीवास्तव : - 
लखनौ विश्वविद्यालयातून फिजिक्स विषयात पदवी संपादन.
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायंसेजमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. 
येथूनच एअरोस्पेस इंजिनिअरींगची पदवी संपादन केली. 
1997 साली इस्रोमध्ये नोकरीला सुरुवात
मंगलयान मध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यभार सांभाळला
चांद्रयान 2 मध्ये मिशन डायरेक्टर

अभिमानाची बाब 
देशासाठी अद्भूत क्षण असून चंद्रावर यान पाठविणाऱ्या काही निवडक देशांमध्ये भारताचा समावेश होत आहे. लखनौच्या कन्येच्या नेतृत्वात ही कामगिरी होत असल्याचा अभिमान आहे. 
डॉ. अलोक धवन, डायरेक्टर IITR
 

Web Title: Moments of pride! 'Chandrayaan 2' is leading the campaign 'Rocket Woman Ritu karidhal shrivastav'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.