पैसे कमी मिळतात, पण इज्जत वाढली, यातच खरे समाधान!, ज्योईता मोंडल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 02:07 AM2017-10-19T02:07:05+5:302017-10-19T02:07:29+5:30

पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूर गावी ज्योईता माही मोंडल या २९ वर्षांच्या व्यक्तीने गेल्या आठवड्यात न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून देशात नवा इतिहास घडविला.

 Money gets less, but respect is the only solution, Jyoti Mondal | पैसे कमी मिळतात, पण इज्जत वाढली, यातच खरे समाधान!, ज्योईता मोंडल

पैसे कमी मिळतात, पण इज्जत वाढली, यातच खरे समाधान!, ज्योईता मोंडल

Next

कोलकाता : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूर गावी ज्योईता माही मोंडल या २९ वर्षांच्या व्यक्तीने गेल्या आठवड्यात न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून देशात नवा इतिहास घडविला. याचे कारण असे की, न्यायाधीश म्हणून नेमणूक होणारी ज्योईता ही देशातील पहिली व्यक्ती आहे.
ज्योईता या लोक अदालतच्या न्यायाधीश असून, इतर दोन न्यायाधीशांसोबत न्यायासनावर बसून त्या प्रकरणे निकाली काढतात. गेल्या आठवड्याभरात त्यांनी बँक आणि कर्जाचे हप्ते न भरलेले खातेदार व मालक आणि भाडेकरू यांच्यातील चार प्रकरणे सहमतीने निकाली काढली.
ज्योईता मोंडल कोलकात्याच्या नेताजीनगर कॉलेजच्या इतिहासाच्या आॅनर्ससह पदवीधर आहेत. राज्य सरकारने लोक अदालतींच्या न्यायाधीशपदासाठी घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत जुलैमध्ये त्यांची गुणवत्तेवर निवड झाली.
सन २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथींना स्वतंत्र लैंगिक मान्यता देऊन त्यांच्यासाठी शिक्षण व नोकºयांमध्ये आरक्षण ठेवण्याचा आदेश सरकारला दिल्यापासून तृतीयपंथी गुणवत्तेवर अनेक क्षेत्रांमध्ये पुढे येत आहेत. समाजाचाही त्यांच्याविषयीचा तिरस्कार व घृणेचा दृष्टिकोन हळूहळू बदलत असून, त्यांनाही एक माणूस म्हणून मान मिळू लागला आहे. ज्योईता मोंडल यांनी न्यायाधीश होऊन या समाजवर्गासाठी एका नव्या क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. त्या अनेक तृतीयपंथीयांच्या नक्कीच आदर्श ठरू शकतील, असे त्यांना वाटते.
इतर तृतीयपंथींप्रमाणे ज्योईता मोंडल शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही पूर्वी रस्त्यावर आणि बस-रेल्वे स्थानकांवर भीक मागायच्या. लग्न समारंभाच्या वेळी दिली जाणारी ‘बिदागी’ हे त्यांचे उत्पन्नाचे दुसरे साधन होते. आता न्यायाधीश म्हणून त्यांना न्यायालयाच्या प्रत्येक कामकाजाच्या दिवशी भत्ता म्हणून ठरावीक रक्कम मिळते.
तुलनेने न्यायाधीश म्हणून आता मिळणारी रक्कम पूर्वीपेक्षा खूपच कमी असल्याने आर्थिक चणचण जाणवते, पण चार पैसे कमी मिळाले, तरी लोकांकडून इज्जत मिळते, याचेच मोठे समाधान असल्याचे ज्योईता मानतात.
(वृत्तसंस्था)

मनाचे समाधान मोठे

पूर्वी लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायचे व अंगावर पाल पडल्यासारखे झटकून टाकायचे. नको ते टोमणेही ऐकायला लागायचे, पण आता लोक आदराने बोलतात, वागतात.
न्यायासनावरील इतर न्यायाधीशही बरोबरीने वागणूक देतात. कोर्टात येणाºया लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यास माझी मदत होते, यानेही मनाचे समाधान होते.

Web Title:  Money gets less, but respect is the only solution, Jyoti Mondal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.