मनी लाँड्रिंग: पुष्पक बुलियनची मालमत्ता जप्त, २१ कोटी ४६ लाखांची संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:47 AM2017-11-17T02:47:55+5:302017-11-17T02:49:16+5:30
सोने बाजारातील प्रसिद्ध पुष्पक बुलियनचे चंद्रकांत पटेल याची २१ कोटी ४६ लाख किंमतीची मालमत्ता गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात पटेलला अटक करण्यात आली आहे.
मुंबई : सोने बाजारातील प्रसिद्ध पुष्पक बुलियनचे चंद्रकांत पटेल याची २१ कोटी ४६ लाख किंमतीची मालमत्ता गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात पटेलला अटक करण्यात आली आहे.
ईडीने पुष्पक बुलियनची २१ कोटी ४६ लाख किंमतीची मालमत्ता जप्त केली. तसेच या प्रकरणातील पाच आरोपींच्या १२ ठिकाणांवर छापे टाकून महत्त्वपूर्ण कागदपत्रेही ताब्यात घेतली. नोटाबंदीच्या काळात पुष्पक बुलियनच्या चंद्रकांत पटेलने मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर केल्याचे समोर आले. याप्रकरणी अवैधरित्या पैसे बाळगल्याप्रकरणी ईडीनेही मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याअंतर्गत पुष्पक बुलियनवर कारवाई केली. यावेळी जवळपास ८४.५ कोटी रुपयांच्या काळ्या धनाची सोने खरेदी केल्याचे उघडकीस आले होते.
पीहू गोल्ड आणि सतनाम ज्वेलर्सच्या नावाने उघडलेल्या दोन शेल कंपनीच्या खात्यातून ही रक्कम पुष्पक बुलियनच्या खात्यात जमा झाली होती. त्याद्वारे २५८ किलो गॅ्रम सोन्याची खरेदी झाल्याचे दाखविण्यात आले होते. शेल कंपनीचे संचालक बोगस असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
ही कारवाई झाल्यानंतर ईडीने पुढील तपास सुरू केला आहे़
२१ कोटी ४६ लाखांची संपत्ती -
याप्रकरणी सीबीआयने गेल्या वर्षी दोन बँक अधिकारी आणि तीन व्यापाºयांविरूद्ध दोन शेल कंपन्यांद्वारे कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा गुन्हा दाखल केला होता़ त्या चौकशीदरम्यान पुढील माहिती उघडकीस आली़ त्यानंतर ईडीने पुष्कक बुलियनचे चंद्रकांत पटेल याची २१ कोटी ४६ लाख किंमतीची मालमत्ता जप्त केली़