मनी पानासाठी - म्युच्युअल फंडांच्या १०० नव्या योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत

By admin | Published: June 25, 2015 11:51 PM2015-06-25T23:51:05+5:302015-06-25T23:51:05+5:30

For Money Pages - 100 new schemes for mutual funds awaiting sanction | मनी पानासाठी - म्युच्युअल फंडांच्या १०० नव्या योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत

मनी पानासाठी - म्युच्युअल फंडांच्या १०० नव्या योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत

Next
>
म्युच्युअल फंडांच्या १०० नव्या योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत

मुंबई - चार वर्षांच्या प्रदीर्घ मंदीनंतर भारतीय शेअर बाजारात तेजीने प्रवेश केल्यानंतर आता म्युच्युअल फंड कंपन्यांनी नवनव्या योजना सादर करण्याचा सपाटा लावला असून आजच्या घडीला सुमारे १०० नव्या योजनांच्या मंजुरीसाठी सेबीकडे अर्ज केला आहे.
सप्टेंबर २०१३ पासून भारतीय शेअर बाजारात तेजीने प्रवेश केला आणि गेल्या पावणेदोन वर्षांच्या कालावधीत सेन्सेक्स आणि निफ्टी अशा दोन्ही निर्देशांकात घसघशीत वाढ होत गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत किमान ८० हजार कोटींनी वाढ झाली. यंदाच्या तेजीचे वैशिष्ट्य म्हणजे, सामान्य गुंतवणूकदारही शेअर बाजारात सक्रिय होताना दिसत आहे. तसेच, म्युच्युअल फंडाद्वारे शेअर बाजारात प्रवेश करणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे. म्युच्युअल फंड कंपन्याही आता मेट्रो शहरांसोबतच महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात विस्तारत आहे. नव्या गुंतवणूकदारांच्या संख्येतही दिवसागणिक मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विविध विभागांतील लोकांच्या गरजांनुसार नव्या योजनांची निर्मिती म्युच्युअल ूफंड कंपन्यांतर्फे होत आहे. उपलब्ध माहितीनुसार, देशातील एकूण ४५ म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी ३३ कंपन्यांच्या सुमारे १०० योजना सध्या सेबीकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी किमान ४० टक्के योजना या कर बचतीच्या योजना असल्याचे समजते. आगामी तीन महिन्यांत यापैकी बहुतांश योजनांना मंजुरी मिळण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी अनेक नवे पर्याय उपलब्ध होतील.
(प्रतिनिधी)

Web Title: For Money Pages - 100 new schemes for mutual funds awaiting sanction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.