CoronaVirus Lockdown जनधन खात्यांमध्ये 4 मेपासून पैसे जमा होणार; पण काढण्यासाठी अनोखा नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 07:20 PM2020-05-02T19:20:16+5:302020-05-02T19:21:37+5:30
CoronaVirus Lockdown पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार पुढील तीन महिने हे पैसे मिळणार आहेत. हे पैसे काढण्यासाठी केंद्र सरकारने काही अटी घातल्या आहेत.
महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात 500 रुपयांच्या शासकीय मदतीचा दुसरा हप्ता सोमवारपासून पाठविण्यात येणार आहे. कोरोना संकटामध्ये गरीबांना मदत म्हणून अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी २६ मार्चला घोषणा केली होती. यामध्ये महिलांना त्यांच्या जनधन खात्यामध्ये एप्रिलपासून ५०० रुपये टाकण्यात येणार होते. ४ मे पासून दुसऱ्या महिन्याचे पैसे टाकण्यात येणार आहेत.
वित्तीय सेवा सचिव देबाशिष पांडा यांनी याची माहिती दिली आहे. मात्र, हे पैसे खात्यात जमा झाल्या झाल्या काढता येणार नाहीत. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार पुढील तीन महिने हे पैसे मिळणार आहेत. हे पैसे काढण्यासाठी केंद्र सरकारने काही अटी घातल्या आहेत. यानुसारच या महिला खातेधारक त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकणार आहेत.
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे. यामुळे बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी पहिल्या महिन्यात गर्दी उसळली होती. असा प्रकार होऊ नये म्हणून केंद्राने एक वेगळी अट घातली आहे. ही रक्कम पाच दिवस ट्रान्सफर केली जाणार आहे. यामुळे आपोआपच सोशल डिस्टन्स पाळला जाणार आहे.
काय आहे प्लॅन...
- ज्या महिला जनधन खातेधारकांचा शेवटचा खाते क्रमांक ० किंवा १ आहे त्यांना ४ मे ला बँकातून पैसे काढता येणार आहेत.
- ज्या महिला जनधन खातेधारकांचा शेवटचा खाते क्रमांक २ किंवा ३ आहे त्यांना ५ मे ला बँकातून पैसे काढता येणार आहेत.
- ज्या महिला जनधन खातेधारकांचा शेवटचा खाते क्रमांक ४ किंवा ५ आहे त्यांना ६ मे ला बँकातून पैसे काढता येणार आहेत.
- ज्या महिला जनधन खातेधारकांचा शेवटचा खाते क्रमांक ६ किंवा ७ आहे त्यांना ८ मे ला बँकातून पैसे काढता येणार आहेत.
- ज्या महिला जनधन खातेधारकांचा शेवटचा खाते क्रमांक ८ किंवा ९ आहे त्यांना ११ मे ला बँकातून पैसे काढता येणार आहेत.
- ११ मे नंतर कोणीही पैसे काढू शकणार आहे.
PM गरीब कल्याण पैकेज के तहत PMJDY के महिला खाता धारकों को Rs.500 की मई माह की किश्त बैंकों में भेजी जा रही है। पैसे पूरी तरह सुरक्षित हैं, बैंकों में भीड़ से बचने के लिए नीचे वाले समय सारणी अनुसार ब्रांच, CSP, बैंक मित्रों से रक़म लें। स्वस्थ रहे, सुरक्षित रहें। @FinMinIndiapic.twitter.com/OFsUwJwHIo
— Debasish Panda (@DebasishPanda87) May 2, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...
तबलिगींच्या दानाचे केले गुणगाण; 'त्या' आयएएस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस
"भारत आणि बंगालदरम्यान काहींना युद्ध हवेय"; ममता बॅनर्जींवर जावडेकरांचा गंभीर आरोप
लॉकडाऊनमध्ये नशेत वेगाने कार घेऊन तरुण बेडरूममध्ये घुसला अन्...