मँगो श्रीखंडपासून ते गुलाब जामून...पोर्तुगालमध्ये मोदींसाठी खास गुजराती जेवणाची सोय

By admin | Published: June 24, 2017 08:54 PM2017-06-24T20:54:45+5:302017-06-24T21:15:31+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पोर्तुगालमध्ये असून तिथे त्यांच्यासाठी खास गुजराती जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे

Mongo Shrint to Gulab ... Portuguese specially designed for Gujarati food in Gujarat | मँगो श्रीखंडपासून ते गुलाब जामून...पोर्तुगालमध्ये मोदींसाठी खास गुजराती जेवणाची सोय

मँगो श्रीखंडपासून ते गुलाब जामून...पोर्तुगालमध्ये मोदींसाठी खास गुजराती जेवणाची सोय

Next
ऑनलाइन लोकमत
लिस्बन, दि. 24 - पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौ-यावर असून शनिवारी पोर्तुगालमध्ये पोहोचले. लिस्बन विमानतळावर पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. यानंतर पंतप्रधान मोदी नेसेसिदाजी पॅलेसमध्ये पोहोचले, तिथे पुन्हा अँटोनियो कोस्टा यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. पॅलेसमध्ये दोघांनीही सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जेवणाकडे विशेष लक्ष देण्यात आलं होतं. त्यांच्यासाठी खास गुजराती पदार्थ तयार करण्यात आले होते. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्तुगालनंतर अमेरिका आणि नेदरलँड्सचा दौरा करणार आहेत. अँटोनियो कोस्टा यांनी यावर्षी जानेवारीत भारत दौरा केला होता. त्यानंतर मोदी पोर्तुगाल दौ-यावर पोहोचले आहेत. अँटोनियो कोस्टा भारतीय वंशाचे असून गोव्याचे आहेत. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जेवणाची विशेष सोय करण्यात आली होती. मोदी गुजरातचे असल्याने त्यांच्या आवडीचे गुजराती पदार्थ तयार करण्यात आले होते. यामध्ये कोफ्ता, राजमा, तडका दाल, केसर राईस, पराठा, रोटी, पापड, मँगो श्रीखंड, गुलाब जामून सहित इतर पदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. 
 
पोर्तुगाल दौ-यासाठी रवाना होण्याआधी मोदींनी सांगितलं होतं की, ""मी 24 जून 2017 रोजी अधिकृतपणे पोर्तुगाल दौ-यावर असेल"".  अँटोनियो कोस्टा यांच्या भारत दौ-यानंतर दोन्ही देशांमधील मैत्रीपुर्ण संबंधांना गती मिळाली आहे. 
 

Web Title: Mongo Shrint to Gulab ... Portuguese specially designed for Gujarati food in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.