गंगाजल ऑनलाइन विक्रीवर साधू-संतांचा आक्षेप
By admin | Published: June 1, 2016 10:08 PM2016-06-01T22:08:11+5:302016-06-01T22:08:11+5:30
गंगाजलच्या ऑनलाइन विक्रीप्रकरणी हरिद्वारमध्ये काही साधू-संतांनी मिळून केंद्र सरकारविरोधात निषेध प्रस्ताव ठेवला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - केंद्र सरकारनं गंगेच्या पाण्याची ऑनलाइन विक्री करण्यासाठी सुरू केलेली योजना त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. गंगाजलच्या ऑनलाइन विक्रीप्रकरणी हरिद्वारमध्ये काही साधू-संतांनी मिळून केंद्र सरकारविरोधात निषेध प्रस्ताव ठेवला आहे. साधू-संतांनी केंद्राच्या योजनेला थेट आव्हान दिलं आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात साधू-संतांनी दिल्लीतल्या जंतरमंतरवर विरोध प्रदर्शन करण्याची धमकीही दिली आहे.
याआधी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गंगाजलाची ऑनलाइन विक्री करण्याची घोषणा केली होती. हृषिकेश आणि गंगोत्रीतूनच गंगाजलाचा पुरवठा करण्याचं ठरलं होतं. हृषिकेशच्या खालच्या बाजूचं गंगाजल जास्त प्रदूषित होतं. त्यामुळेच हृषिकेश किंवा गंगोत्रीचं गंगाजल देण्याचं ठरलं होतं. गंगाजल बुक करणा-याला स्वतःच्या नाव आणि पत्त्यासह संपूर्ण तपशील देणं बंधनकारक असून, गंगाजलची किंमत ऑनलाइन देण्याची ही योजना आहे.