माकड तापाची दहशत!

By admin | Published: May 3, 2015 12:56 AM2015-05-03T00:56:22+5:302015-05-03T06:19:37+5:30

कर्नाटकमध्ये आढळणाऱ्या माकड तापाची गोव्यातील सत्तरी तालुक्यात साथ पसरली असून त्यात सहा जणांचे बळी गेल्याने राज्याची आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे.

Monkey fire panic! | माकड तापाची दहशत!

माकड तापाची दहशत!

Next

सद्गुरू पाटील, पणजी
कर्नाटकमध्ये आढळणाऱ्या माकड तापाची गोव्यातील सत्तरी तालुक्यात साथ पसरली असून त्यात सहा जणांचे बळी गेल्याने राज्याची आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे.
माकडांच्या शरीरावरील किट्ट्या (महाराष्ट्रात पिसू म्हणतात) माणसाला चावल्या की किस्नूर फॉरेस्ट डिसिज (केएफडी) म्हणजेच माकड तापाची लागण होते, असे आरोग्य खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
गोव्यात याआधी माकड तापाची (केएफडी) लागण झाल्याची नोंद गेल्या ६० वर्षांत झालेली नाही. मात्र कर्नाटकच्या सीमेवरील गोव्यातील सत्तरी तालुक्यातील पाली गाव व परिसरात माकड तापाचे २६ रुग्ण अचानक आढळले आहेत.
सत्तरी तालुक्यातील या आजाराचा अहवाल गोवा सरकारने मणिपाल येथील विद्यापीठाकडून घेतला. त्यानंतर कर्नाटकमध्ये आढळणारा हा माकड ताप असल्याचे त्यावरून स्पष्ट झाले. आरोग्य विभागाने ३५ रुग्णांची तपासणी केली. त्यातील २६ रुग्ण माकड तापाचे असल्याचे आढळल्याने सारेच हादरले.

Web Title: Monkey fire panic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.