हृदयद्रावक! माकड घरात शिरलं, पाळण्यातलं दीड महिन्याचं बाळ पळवलं अन् छतावरून फेकलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 04:28 PM2023-01-04T16:28:27+5:302023-01-04T16:29:00+5:30
एका माकडाने घरात घुसून दीड महिन्याचे बाळ पळवून नेलं.
उत्तर प्रदेशातील बांदा येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका माकडाने घरात घुसून दीड महिन्याचे बाळ पळवून नेलं. मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने नातेवाईक पोहोचले तेव्हा माकडाने मुलाला पायऱ्यांवरून वर नेण्यास सुरुवात केली होती. छतावर पोहचल्यावर माकडाने मुलाला तिथून खाली फेकलं. उंचावरून खाली पडल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिंदवारीच्या छपर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. 14 नोव्हेंबर रोजी विश्वेश्वर यांच्या घरामध्ये मुलाचा जन्म झाला. विश्वेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी बाळाला खोलीत झोपवल्यानंतर त्यांची पत्नी भांडी घासत होती. तेवढ्यात चार-पाच माकडं खोलीत शिरली. एका माकडाने पाळण्यात झोपलेल्या बाळाला उचललं.
माकड मुलाला घेऊन जात असताना मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून मुलगी निम्मा पोहोचली तेव्हा माकडाच्या हातात बाळाला पाहून तिने आरडाओरडा सुरू केला. माकड वेगाने पळू लागले आणि मुलाला छतावर घेऊन गेलं आणि तिथून खाली फेकलं. बाळ खाली पडलं. त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागले. घाईघाईत कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
गावातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात 100 हून अधिक माकडं दहशत निर्माण करत आहेत. चार महिन्यांपूर्वी एडीएमकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर वनरक्षक रामराज आले. ते फिरले आणि नंतर निघून गेले. माकडांना पकडण्याची व्यवस्था केली असती तर आज बाळाचा मृत्यू झाला नसता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"