नवजात बाळाला दूध पाजताना माकडानं पळवलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 04:50 PM2018-11-13T16:50:38+5:302018-11-13T16:56:28+5:30
कडानं चक्क आईच्या कुशीतून बाळाला पळवलं आहे आणि त्याला जमिनीवर आपटून मारलं.
आग्रा- उत्तर प्रदेशातल्या आग्र्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. लोकांच्या हातातल्या पिशव्या पळवणारं माकड तुम्ही पाहिलंच असेल, परंतु एका माकडानं चक्क आईच्या कुशीतून बाळाला पळवलं आहे आणि त्याला जमिनीवर आपटून मारलं. पोलिसांच्या माहितीनुसार, आग्र्यातल्या रुनकता भागात ही घटना घडली आहे. रुनकता भागातच योगेश स्वतःच्या कुटुंबीयाबरोबर राहतात. योगेश हे रिक्षाचालक आहेत. त्यांचं नेहाशी दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. दोघांच्या घरी 12 दिवसांपूर्वीच तान्हा पाहुणा आला होता.
नेहा रात्री स्वतःच्या 12 दिवसांच्या बाळाला दूध पाजत होती. त्यावेळी घराचा दरवाजा खुला होता. त्यावेळी एका माकडानं अचानक घरात प्रवेश केला. नेहाला काळी कळण्याआधीच त्यानं बाळाची मान पकडली आणि त्याला उचलून बाहेर घेऊन गेला. नेहाही धावत त्या माकडाच्या मागे पळू लागली. माकड पळत शेजाऱ्याच्या छतावर गेला. नेहाचा आवाज ऐकून लोक घरातून बाहेर आले. सर्वांनी माकडाला पळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माकडानं त्या चिमुकल्याला फेकून पळ काढला. माकडानं मान पकडल्यामुळे बाळाच्या मानेतून रक्तस्राव होत होता. त्याला लागलीच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या बाळाची हत्या करण्याआधी माकडांनी या भागात 14 वर्षांच्या मुलीवरही हल्ला केला होता. तेव्हा त्या मुलीलाही दुखापत झाली होती. पोलीस निरीक्षक अतबीर सिंह यांनी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनात बाळाच्या डोक्याला आणि गळ्याला गंभीर दुखापत झाली. गेल्या काही दिवसांपासून या भागात माकडांचा उच्छाद वाढला आहे. त्यामुळे नागरिक भीतीग्रस्त आहेत.