माकडाने पळवली ७५ हजारांची रोकड, हजारो रुपयांच्या नोटा फाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 06:55 AM2022-11-18T06:55:10+5:302022-11-18T06:55:39+5:30

Monkey: उपद्रवी माकडांमुळे हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील लोक सध्या खूप हैराण आहेत. एका माकडाने तर कहरच केला. ७५ हजार रुपये असलेली बॅग हिसकावून ते पळून गेले.

Monkey stole 75 thousand in cash, tore thousands of rupees notes | माकडाने पळवली ७५ हजारांची रोकड, हजारो रुपयांच्या नोटा फाडल्या

माकडाने पळवली ७५ हजारांची रोकड, हजारो रुपयांच्या नोटा फाडल्या

Next

चंदीगड : उपद्रवी माकडांमुळेहिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील लोक सध्या खूप हैराण आहेत. एका माकडाने तर कहरच केला. ७५ हजार रुपये असलेली बॅग हिसकावून ते पळून गेले. त्याने बॅगेतून अनेक नोटा काढून फाडल्या तर चार हजार रुपये किमतीच्या नोटा इकडे तिकडे फेकून दिल्या. या माकडाला हरप्रकारे समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही.  मॉल रोडवरील एका कार्यालयात एक जण बिल जमा करण्यासाठी आला असता ही घटना घडली. 

ब्लॅकमेलिंग फंडा
शिमल्यात माकडांनी पर्यटकांची पर्स, चष्मा, कॅप, बॅग हिसकावून घेतल्याच्या घटना समोर येत आहेत. पर्यटक स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना काही खाद्यपदार्थ देऊन त्यांचे मन वळवतात.

Web Title: Monkey stole 75 thousand in cash, tore thousands of rupees notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.