Monsoon: १०० वर्षांमधील सर्वात कोरडा ऑगस्ट, हवामान खात्यानं व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 07:03 PM2023-08-18T19:03:33+5:302023-08-18T19:31:39+5:30
Monsoon 2023: जुलै महिन्यात बऱ्यापैकी बरसलेल्या मान्सूनने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून ओढ दिली आहे. त्यामुळे यावर्षीचा ऑगस्ट महिना गेल्या १०० वर्षांमधील सर्वात ऑगस्ट महिना होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
जुलै महिन्यात बऱ्यापैकी बरसलेल्या मान्सूनने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून ओढ दिली आहे. त्यामुळे यावर्षीचा ऑगस्ट महिना गेल्या १०० वर्षांमधील सर्वात ऑगस्ट महिना होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अंशत: अल निनोमुळे देशातील मोठ्या भूप्रदेशात कमी पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना सांगितले की, १९०१ मध्ये आकडेवारी ठेवण्यास सुरुवात केल्यापासून यावर्षी ऑगस्टमधील पर्जन्यमान सर्वात कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांदळापासून सोयाबीनपर्यंत उन्हाळ्यात घेण्यात येणाऱ्या पिकांचं उत्पादन कमी होऊन त्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
आयएमडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर रॉयटर्सला सांगितले की, अपेक्षेनुरूप मान्सून पुनरुज्जीवित होत नाही आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत दक्षिण, पश्चिम आणि मध्य भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी झाल्याचं दिसत आहे. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत पडलेला पाऊस आणि महिन्यातील पुढच्या काही दिवसांत पडणाऱ्या पावसाच्या अंदाजाच्या आधारावर भारतात या महिन्यात सरासरी १८० मिमी (७ इंच) कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, भारतामध्ये ऑगस्ट महिन्यातील पहिल्या १७ दिवसांध्ये केवळ ९०.७ मिमी (३.६ इंच) पाऊस कमी पडला आहे. तो सरासरीपेक्षा ४० टक्क्यांनी कमी आहे. महिन्यातील पावसाची सरासरी २५४.९ मिमी (१० इंच) आहे.
याआधी आयएमडीने ऑगस्ट महिन्यामध्ये ८ टक्क्यांपर्यंत कमी पर्जन्यमानाची शक्यता वर्तवली होती. दरम्यान, रेकॉर्डनुसार, ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस हा २००५ मध्ये पडला होता. तेव्हा १९१.२ मिमी (७.५ इंच) पाऊस पडला होता.
आयएमडीच्या एका अन्य अधिकाऱ्याने सांगितले की, पूर्वोत्तर आणि काही मध्य भागामध्ये पुढच्या दोन आठवड्यांमध्ये मान्सूनच्या पावसामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. मात्र अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात पाच ते सात दिवस कोरडे हवामान राहतात. मात्र यावेळी दक्षिण भारतामध्ये शुष्क हवामान असामान्यपणे दीर्घकाळ राहिले आहे. अल निनो पॅटर्नने भारतीय मान्सूनला प्रभावित करण्यास सुरुवात केली आहे.