पावसाचे थैमान! आठ राज्यांत तब्बल 470 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 08:37 AM2020-07-22T08:37:38+5:302020-07-22T08:43:13+5:30

पश्चिम बंगाल, आसाम आणि गुजरात या राज्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

monsoon have caused 470 deaths du to floods an landslides india this year | पावसाचे थैमान! आठ राज्यांत तब्बल 470 जणांचा मृत्यू

पावसाचे थैमान! आठ राज्यांत तब्बल 470 जणांचा मृत्यू

Next

नवी दिल्ली - सध्या देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.तर दुसरीकडे देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. आठ राज्यांत पावसाने थैमान घातले असून तब्बल 470 जणांचा मृत्यू झाल्याची महिती मिळत आहे. पूर आणि भूस्खलनमुळे आतापर्यंत 470 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पश्चिम बंगाल, आसाम आणि गुजरात या राज्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. 

देशातील अनेक राज्यांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून परिस्थिती गंभीर आहे. लाखो लोकांना पुराचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पुराच्या पाण्याने जमीन वाहून गेली आहे. नैसर्गिक आपत्तीपासून बचाव व मदतकार्य करणारं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) घटनास्थळी दाखल झाले आहे. एनडीआरएफच्या 70 हून अधिक टीम युद्धपातळीवर मदत करत आहे. 

गृह मंत्रालयाने दिलेल्या आकड्यांनुसार, या वर्षी पावसाळ्यात पश्चिम बंगालमध्ये पुरामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 142 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही लोक अद्यापही बेपत्ता आहे. आसाममध्ये ही मुसळधार पावसामुळे 111 आणि गुजरातमध्ये 81 लोकांचा मृत्यू झाला. या शिवाय महाराष्ट्रात 46 तर मध्य प्रदेशमध्ये 44 लोकांना पावसामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षीही मुसळधार पावसामुळे देशाचं नुकसान झालं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

आसामचं पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील 33 जिल्ह्यांमधील 24 जिल्ह्यातील 25 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामध्ये सर्वाधित 4.53 लाख लोक हे गोलपाडामधील आहेत. तसेच बारपेटामध्ये 3.44 लाख लोक आणि मोरीगावातील 3.41 लाखांहून अधिक लोकांनाही पुराचा फटका बसल्याची माहिती मिळत आहे. काझीरंगा अभयारण्यातील 108 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. आसाममधील सध्याच्या पूरस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडून दूरध्वनीवरून घेऊन ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. 

पुराचा फटका बसलेल्या आसामला पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. पंतप्रधान मोदींनी संपर्क साधून राज्यातल्या विविध विषयांची माहिती घेतल्याचं मुख्यमंत्री सोनोवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. 'पंतप्रधान मोदींनी आसाममधील पूरस्थिती, कोरोना संकट आणि बघजन तेलविहिरीतील आगीबद्दलची माहिती फोनवरून घेतली. त्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. या कठीण काळात देश तुमच्यासोबत असून राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल, असं आश्वासन मोदींनी दिलं, असं सोनोवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

...म्हणून दर 6 महिन्यांनी होणार आता सिमकार्ड व्हेरिफिकेशन, जाणून घ्या नवा नियम

CoronaVirus News : भारीच! हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' राज्याने कोरोनाला असं लावलं पळवून

CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाग्रस्तांसाठी 'हे' औषध ठरतंय संजीवनी; 79 टक्के धोका झाला कमी

CoronaVirus News : अरे व्वा! कोविड सेंटरमध्येच रुग्णांनी केला भन्नाट डान्स, Video तुफान व्हायरल

CoronaVirus News : आजारी आईला पाहण्यासाठी 'तो' रुग्णालयाच्या इमारतीवर चढायचा अन्...; मन सुन्न करणारी घटना

Web Title: monsoon have caused 470 deaths du to floods an landslides india this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.