मॉन्सूनची कर्नाटकातील कारवारपर्यंत धडक; गोव्याच्या नजीक येऊन ठेपला मॉन्सून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 07:27 PM2020-06-04T19:27:36+5:302020-06-04T19:29:58+5:30

निसर्ग चक्रीवादळामुळे गेले दोन दिवस केरळमध्येच थबकला मॉन्सून..

Monsoon is hit till to Karwar in Karnataka; monsoon near of goa | मॉन्सूनची कर्नाटकातील कारवारपर्यंत धडक; गोव्याच्या नजीक येऊन ठेपला मॉन्सून

मॉन्सूनची कर्नाटकातील कारवारपर्यंत धडक; गोव्याच्या नजीक येऊन ठेपला मॉन्सून

Next

पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे गेले दोन दिवस केरळमध्येच थबकलेल्या मॉन्सूनच्या अरबी समुद्राच्या शाखेने आज जोरदार वाटचाल करीत थेट कर्नाटकातील किनारपट्टीवरील कारवारपर्यंत धडक मारल्याचे हवामान विभागाने
गुरुवारी जाहीर केले आहे. मॉन्सूनने संपूर्ण केरळ, कर्नाटकाचा काही भाग, कोमोरिनचा व नैऋत्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात, दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागराचा बहुतांश भागात व मध्य पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागात प्रवेश केला आहे. मॉन्सून गोव्याच्या नजीक आला असून सध्या तो कन्याकुमारी, कोईमतूर, हसन, कारवारपर्यंत पोहचला आहे. येत्या २ ते ३ दिवसात मध्य अरबी समुद्र, कनार्टक, तामिळनाडु, पाँडेचरी, कराईकल तसेच बंगालच्या उपसागरात आणखी काही भाग आगमनाच्या दृष्टीने अनुकुल स्थिती आहे.

गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

महाबळेश्वर १८७, पेण १६०, गगनबावडा, पोलादपूर १४५, लांजा १३०, दापोली १२०, चिपळूण १००, राजापूर, हर्णे ९०, गुहागर ८०, जव्हार ७०, भुसावळ, इगतपुरी ११०, माहे १२७, अलिबाग १०८, पणजी २६़५, चंदगड ८०, सुरगणा, दिंडोरी, राधानगरी, यावल ७०, चिंचवड, पन्हाळा, निफाड, नंदुरबार ६०, येवला ५०, नसरापूर आणि जाफराबाद ४८, वैजापूर ३९, औरंगाबाद २३, मुंबई ५०, नागपूर १८, पुणे ४३.१, नाशिक १४४.२, कोल्हापूर १४.७, रत्नागिरी ५२.६, सातारा ५७.१, सांगली ११.७, मालेगाव ६०, जळगाव २२.५, अकोला ६.१ मिमी पावसाची नोंद झाली होती.

* ५ जूनला विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. * ७ व ८ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
 

Web Title: Monsoon is hit till to Karwar in Karnataka; monsoon near of goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.