हैदराबादमध्ये पावसाचा कहर, चौघांचा मृत्यू
By admin | Published: August 31, 2016 11:07 AM2016-08-31T11:07:37+5:302016-08-31T11:08:36+5:30
मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे चौघांचा मृत्यू झाला असून यामधील तिघांचा मृत्यू भिंत कोसळल्याने झाला आहे
Next
- ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 31 - मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे चौघांचा मृत्यू झाला असून यामधील तिघांचा मृत्यू भिंत कोसळल्याने झाला आहे. मुशीराबादमध्ये ही घटना घडली. ठिकठिकाणी पाणी साचले असून अनेक ठिकाणी वाहतूकीची कोंडी झाली आहे. राज्य सरकारने कर्मचा-यांना कार्यालयात एक तास उशिरा पोहोचण्याची मुभादेखील दिली होती.
रायलसीमा आणि आंध्रप्रदेशच्या किनारी भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हैदराबाद महापालिका आयुक्त जनार्दन रेड्डी यांनी महापालिका कर्मचारी आणि आणीबाणी पथक वगळता इतर नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलं आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आयुक्त मुख्य सचिवांची भेट घेणार आहेत.
Heavy rains cause severe traffic congestion in parts of Hyderabad, streets flooded with water pic.twitter.com/VbeKp3lIaD
— ANI (@ANI_news) August 31, 2016
Heavy rainfall causes severe water logging in parts of Hyderabad, vehicles submerged in rainwater in Secunderabad pic.twitter.com/7HFcWl92vH
— ANI (@ANI_news) August 31, 2016