मान्सून वेगाने पुढे; लवकरच महाराष्ट्रात, पूर्वेकडील भागात उष्णतेची लाट कायम राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 06:03 AM2023-06-10T06:03:15+5:302023-06-10T06:03:55+5:30
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिणेकडून पुढे सरकत १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मान्सूनची वाटचाल वेगाने होत आहे. मान्सून उद्या, शनिवारपर्यंत कर्नाटक-तामिळनाडूमध्ये पोहोचेल. दक्षिण तामिळनाडूच्या काही भागात पाऊस सुरू झाला आहे. दोन दिवसांत तो दोन्ही राज्यांमध्ये व्यापेल, असा अंदाज आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिणेकडून पुढे सरकत १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल. त्यानंतर तो पश्चिम बंगालमधून बिहारच्या दिशेने सरकेल. १५ जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि संपूर्ण बिहारमध्ये पाऊस सुरू होईल.
...अन् उष्णतेची लाटही
पूर्वेकडील भागात ३-४ दिवस उष्णता वाढेल. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, पूर्व उत्तर प्रदेश, आंध्र व तेलंगणामध्ये उष्णतेची लाट कायम राहील. राजस्थान, पंजाब, हरयाणा, दिल्ली, प. उत्तर प्रदेशमध्ये तापमान ३-५ अंशांनी जास्त असेल.