Monsoon Session: महागाईचा अनोख्या पद्धतीने विरोध; TMCच्या महिला खासदाराने लोकसभेत खाल्ले कच्चे वांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 08:10 PM2022-08-01T20:10:01+5:302022-08-01T20:16:39+5:30

Monsoon Session: 'पूर्वी सिलिंडरच्या किमती वाढल्या तर भाजप नेते रिकामे सिलिंडर घेऊन संसदेत यायचे. पण आता...'

Monsoon Session: Kakoli Ghosh Dastidar: TMC woman MP Kakoli Ghosh Dastidar eats raw brinjal in Lok Sabha | Monsoon Session: महागाईचा अनोख्या पद्धतीने विरोध; TMCच्या महिला खासदाराने लोकसभेत खाल्ले कच्चे वांगे

Monsoon Session: महागाईचा अनोख्या पद्धतीने विरोध; TMCच्या महिला खासदाराने लोकसभेत खाल्ले कच्चे वांगे

Next

Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून, ते वादळी ठरले आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीपासून महागाईसह विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदार काकोली घोष दस्तीदार (Kakoli Ghosh Dastidar) यांनी लोकसभेत एक वेगळ्या पद्धतीने विरोध दर्शवला. 

सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने खासदार संतापल्या
सध्या घरगुती गँस सिलिंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या वाढलेल्या किमतीवरुन काकोली घोष दस्तीदार यांनी अनोखा विरोध दर्शवला. त्यांनी लोकसभेत बोलताना कच्चे वांगे खाल्ले. हे वांगे खाताना त्यांनी वाढत्या किमतीवरुन केंद्रावर टोलाही लगावला. "घरगुती गॅस इतका महाग झाला आहे की, आता फक्त कच्च्या भाज्या खाव्या लागताहेत," असा टोला त्यांनी लगावला.

अख्ख वांग खाल्ल नाही
दस्तीदार यांची ही विरोध दर्शवण्याची एक पद्धत होती. यावेळी त्यांनी पूर्ण वांगे खाल्ले नसून, फक्त दाताने एक घास खाऊन वांगे बाजुला ठेवले. यावेळी त्यांनी सिलिंडरच्या वाढत्या किमतीवरुन सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, "पूर्वी सिलिंडर 600 रुपयाला मिळत होता, आता 1100 रुपयांना घ्यावा लागतोय. एकेकाळी सिलिंडरच्या किमती वाढल्या तर भाजप नेते रिकामे सिलिंडर घेऊन संसदेच्या आवारात यायचे. पण, आज कोणी विरोध करत असेल तर त्याचा आवाज दाबला जातोय."
 

Web Title: Monsoon Session: Kakoli Ghosh Dastidar: TMC woman MP Kakoli Ghosh Dastidar eats raw brinjal in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.