जूनपासून मान्सून बरसणार, पण या 7 राज्यांत कमी पाऊस पडणार - IMD ची भविष्यवाणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 10:58 AM2024-05-28T10:58:46+5:302024-05-28T11:00:56+5:30
आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहिती नुसार, जून ते सप्टेंबर दरम्यान देशभरात सामान्य ते अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे.
देशभरातील तापमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. लोक गर्मीचा सामना करत आहेत. यातच भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) या वर्षात देशात सामान्य ते अधिक मान्सून बरसण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच, उत्तर आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये मान्सूनचा परिणाम कमी असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहिती नुसार, जून ते सप्टेंबर दरम्यान देशभरात सामान्य ते अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे. मात्र, जम्मू कश्मीर, लद्दाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील काही भागांत सामान्यपेक्षाही कमी पाऊस होऊ शकतो.
दिल्ली-उत्तर प्रदेशात किती पाऊस? -
आयएमडी प्रमुख मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहिती नुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 106 टक्के एवढा पाऊस होण्याची शक्यता आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशसह वायव्य भारतात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. याभाकात एलपीएच्या 92 ते 108 टक्के एवढा पाऊस होऊ शकतो. हा पाऊस सामान्य श्रेणीतील अधिक पाऊस आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचलच्या काही भागांत कमी पावसाचीशक्यता आहे.
या ठिकाणीही सामान्य पावसाचा अंदाज -
महापात्रा यांच्या मते, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील गंगा नदीचा प्रदेश, दक्षिण छत्तीसगड आणि ईशान्य राज्यांच्या अनेक भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि ओडिशा या राज्यांत पाऊस सामान्यपेक्षा अधिक होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कमी पाऊस आणि अधिक पाऊस कसे ओळखले जाते? -
हवामान विभागानुसार, जर पाऊस एलपीएच्या 90 टक्क्यांहून कमी झाला, तर त्याला कमी पाऊस झाला, असे गृहित धरले जाते. 90 ते 95 टक्क्यांदरम्यान पासून झाला, तर त्याला सामन्यपेक्षा कमी, असे म्हटले जाते. 96 ते 104 टक्क्यांदरम्यान सामान्य आणि 105 ते 110 टक्क्यांदरम्यान सामान्य ते अधिक पाऊस मानला जातो.