मोदी सरकारच्या अर्थनितीवर किती टक्के लोकं समाधानी? जाणून घ्या, देशाचा मूड ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 10:00 PM2022-01-21T22:00:45+5:302022-01-21T22:01:29+5:30

Mood Of The Nation Survey: वाढती महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरलेला असताना देशातील जनतेनं मात्र मोदी सरकारच्या अर्थनितीवर समाधान व्यक्त केलं आहे.

mood of the nation survey india today c voter modi govt economic policies | मोदी सरकारच्या अर्थनितीवर किती टक्के लोकं समाधानी? जाणून घ्या, देशाचा मूड ​​​​​​​

मोदी सरकारच्या अर्थनितीवर किती टक्के लोकं समाधानी? जाणून घ्या, देशाचा मूड ​​​​​​​

Next

Mood Of The Nation Survey: वाढती महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरलेला असताना देशातील जनतेनं मात्र मोदी सरकारच्या अर्थनितीवर समाधान व्यक्त केलं आहे. तथापि, मोदी सरकराच्या आर्थिक नितींवर पसंती देणाऱ्या लोकांच्या संख्येत गेल्या वर्षभरात घट झाली आहे. देशातील सध्या ५२ टक्के जनता मोदी सरकारच्या आर्थिक नितीवर संतुष्ट आङे. इंडिया टुडे आणि सी वोटरच्या ताज्या सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे. 

देशाचा मूड जाणून घेण्यात आलेल्या सर्व्हेत वर्षभरापूर्वी ६० टक्क्यांहून अधिक जनतेनं मोदी सरकारच्या आर्थिक नितीवर पसंती दर्शवली होती. पण यात घट झाली असून हे प्रमाण ५२ टक्क्यांवर आळं आहे. ताज्या सर्व्हेनुसार १९ टक्के जनता आर्थिक बाजूनं मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचं म्हणत आहेत. तर २६ टक्के लोक सरकारच्या कामगिरीवर खूश आहेत. 

बड्या उद्योपतींना मोठा फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला विरोधकांनी नेहमीच बड्या उद्योगपतींचं सरकार अशी उपमा दिली आहे. सर्वेक्षणात जेव्हा याबाबत विचारण्यात आलं तेव्हा ४८ टक्के लोकांनी मोदी सरकारमुळे बड्या उद्योगपतींना फायदा होत असल्याचं म्हटलं आहे. तर १२ टक्के लोकांनी शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं म्हटलं आहे. तसंच मोदी सरकारच्या नितीमुळे नोकरदार वर्गाचा ८ टक्के फायदा झाल्याचं म्हटलं आहे. तसंच ८ टक्के लोकांच्या मते मोदी सरकारमुळे छोट्या व्यावसायिकांचा फायदा झाला आहे. 

क्रिप्टोकरन्सीवर बंदी हवी
क्रिप्टोकरन्सीवर बंदीच्या बाबतीत विचारण्यात आलं असता ३० टक्के लोकांनी क्रिप्टोकरन्सीवर बंदी असावी याबाजूनं कौल दिला आहे. तर २८ टक्के लोकांनी क्रिप्टोकरन्सीच्या बाजूनं आपलं मत व्यक्त केलं आहे. 

कोरोनाबाबत आर्थिक उपायांवर जनता खूश
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. सरकारनं अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेज लॉन्च केलं. यावर जनता खूश असल्याचं दिसून आलं आहे. ६० टक्के लोकांनी कोरोना काळात मोदी सरकारनं केलेल्या आर्थिक उपयांवर समाधान व्यक्त केलं आहे. तर ३१ टक्के लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात ९ टक्के लोकांनी याबाबत काहीच मत व्यक्त करता येणार नाही असं म्हटलं आहे. 

Web Title: mood of the nation survey india today c voter modi govt economic policies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.