'मूडीज्'नं भारताचं क्रेडिट रेटींग वाढवलं, नोटाबंदी व जीएसटीचंही केलं कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 09:16 AM2017-11-17T09:16:38+5:302017-11-17T09:43:29+5:30

भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातील एक चांगली बातमी समोर आली आहे. 'मूडीज्'नं भारताचं क्रे़डिट रेटींग वाढवलं आहे.

moodys upgrades indias rating says reforms will foster sustainable growth | 'मूडीज्'नं भारताचं क्रेडिट रेटींग वाढवलं, नोटाबंदी व जीएसटीचंही केलं कौतुक 

'मूडीज्'नं भारताचं क्रेडिट रेटींग वाढवलं, नोटाबंदी व जीएसटीचंही केलं कौतुक 

Next

नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातील एक चांगली बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी 'मूडीज्'ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला आहे. भारत सरकारने लागू केलेल्या जीएसटी, आधार संलग्नता आणि विविध लाभांचे पैसे थेट खात्यात जमा करणे अशी विविध महत्त्वाची पावले उचलण्यात आल्याने  'मूडीज्'ने हा निर्णय घेतला आहे. 

या रेटिंगमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर सुधारणा झाली आहे. 'मूडीज्'ने 2004 साली बीएए 3 हे रेटिंग दिले होते, त्यानंतर आता ते वाढवून बीएए 2  करण्यात आले. या रेटिंग वाढवण्याचा तात्काळ फायदा म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय कर्जे घेणे सुसह्य होणार असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पत ही सुधारणार आहे.

"भारत सरकारने उचललेल्या पावलांमुळे अंतर्गत व परदेशी गुंतवणूक वाढेल, शाश्वत व भक्कम वाढीस प्राधान्य मिळेल, व्यवसायात चांगली स्थिती निर्माण होईल. वृद्धीची आणि विविध धक्के पचवण्याची क्षमता वाढवणे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मकता वाढण्यास या सुधारणांचा फायदा होईल" असे 'मूडीज्'ने  प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जीएसटी आणि नोटाबंदी निर्णयामुळे उद्योगावर परिणाम झाला, अशी सध्या केंद्र सरकारवर टीका होत आहे. विरोधकांनी सरकारला या मुद्यावर गेले वर्ष धारेवर धरले असताना 'मूडीज्'ने वाढवलेले रेटिंग सरकारला दिलासादायक ठरणार आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुजरात निवडणुकांमध्ये याचा उपयोग नरेंद्र मोदी यांचे सरकार निश्चितच या मुद्याचं उपयोग करुन घेईल. याआधीही उद्यम सुलभतेत भारताने उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल केंंद्र सरकारला जगातिक संस्थांची शाबासकी मिळाली आहे.

Web Title: moodys upgrades indias rating says reforms will foster sustainable growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.