चंद्र देणार ऊर्जा

By admin | Published: February 21, 2017 01:01 AM2017-02-21T01:01:53+5:302017-02-21T01:01:53+5:30

भारताच्या उर्जेच्या गरजा भागवायला चंद्र धावून येईल. चंद्रावर हेलियम एवढ्या प्रमाणात आहे की, ते अख्या जगाच्याही ऊर्जेची

Moon power | चंद्र देणार ऊर्जा

चंद्र देणार ऊर्जा

Next

नवी दिल्ली : भारताच्या उर्जेच्या गरजा भागवायला चंद्र धावून येईल. चंद्रावर हेलियम एवढ्या प्रमाणात आहे की, ते अख्या जगाच्याही ऊर्जेची गरज पूर्ण करू शकते. २०३० मध्ये ही ऊर्जा वापरता येईल, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थतील (इस्रो) शास्त्रज्ञांनी म्हटले.
इस्रोचे शास्त्रज्ञ एस. पिल्लई यांनी सांगितले की, भारत त्याच्या उर्जेच्या गरजा भागवण्यासाठी चंद्राची मदत घेऊ शकते. चंद्रावरील हेलियम-३ खाणी २०३० मध्ये भारताच्या उर्जेच्या गरजा भागवू शकतील, अशी शनिवारी खात्री पटली. या प्रक्रियेचे लक्ष्य २०३० पर्यंत गाठले जाईल. आॅब्झर्वर रिसर्च फाऊंडेशन (ओआरएफ)-कल्पना चावला स्पेस पॉलिसी डायलॉगमध्ये केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. पिल्लई म्हणाले की चंद्रावरील खाणी या हेलियम-३ ने समृद्ध आहेत व इस्रोच्या प्राधान्याने करायच्या कामात याचा समावेश आहे. या उर्जेसाठी इतरही देश प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Moon power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.