प्रेमासाठी बदलला धर्म, शिफा झाली संध्या; कुटुंबीयांचा विरोध, हिंदू रितीरिवाजांनुसार केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 01:22 PM2024-05-28T13:22:14+5:302024-05-28T13:24:16+5:30

शिफा नावाच्या तरुणीने आपल्या प्रियकरासह सप्तपदी घेतले आहेत. त्यासाठी शिफा संध्या झाली आहे.

moradabad inter religion love marriage shifa to sandhya | प्रेमासाठी बदलला धर्म, शिफा झाली संध्या; कुटुंबीयांचा विरोध, हिंदू रितीरिवाजांनुसार केलं लग्न

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. शिफा नावाच्या तरुणीने सनातन धर्म स्वीकारून आपल्या प्रियकरासह सप्तपदी घेतले आहेत. त्यासाठी शिफा संध्या झाली आहे. तिने आर्य समाज मंदिरात अनमोल नावाच्या व्यक्तीसोबत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं. संध्या ही अमरोहा जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या ती मुरादाबादमध्ये अनमोल नावाच्या तरुणासोबत राहत आहे. 

संध्या आणि अनमोल या दोघांचंही कुटुंब या लग्नावर खूश नव्हतं आणि दोघांच्याही कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे या दोघांनी लग्नासाठी एका ट्रस्टची मदत घेतली आणि रविवारी मंदिरात लग्न केलं आहे. दोघंही काही वर्षांपूर्वी खासगी नोकरी करत असताना एकमेकांना भेटले, त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. 

अनमोल नावाच्या तरुणाने गौ सेवा ट्रस्टचे संचालक सचिन सक्सेना यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर ट्रस्टने संध्या आणि अनमोलचे रविवारी आर्य समाज मंदिरात हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावून दिलं. संध्याने सांगितलं की, ती स्वतःच्या इच्छेने हिंदू धर्म स्वीकारत आहे आणि ती सुरुवातीपासून शाकाहारी आहे. तिला धर्म बदलण्यात काहीच अडचण नाही.  

गौ माता सेवा ट्रस्टचे संचालक सचिन सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरोहा येथे राहणारी तरुणी दोन वर्षांपासून काम करत होती. सहा महिन्यांपूर्वी तिची मुरादाबाद येथील एका तरुणाशी ओळख झाली आणि ते दोघे प्रेमात पडले. यानंतर दोघांनाही लग्न करायचं होतं. पण घरच्यांनी त्यांना हाकलून दिले. यानंतर ते आमच्याकडे आले आणि आर्य समाजाच्या माध्यमातून आम्ही दोघांचं लग्न लावून दिलं. मुलीने आपला धर्म बदलून सनातन धर्माचा स्विकार केला आहे आणि तिचं नाव शिफावरून संध्या असं ठेवलं आहे.
 

Web Title: moradabad inter religion love marriage shifa to sandhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न