हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:17 IST2025-04-24T12:16:26+5:302025-04-24T12:17:00+5:30
बुलेटवरुन प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये बुलेटवरुन प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळपास काही मिनिटं रस्त्यावर तो वेदनेने तडफडत राहिला. जेव्हा लोकांनी हे पाहिलं तेव्हा ते मदतीला धावून आले आणि त्याला तातडीने सीपीआर दिला, त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं, पण तरुणाचा मृत्यू झाला.
मुरादाबादमधील कोतवाली कटघर परिसरातील पचपेडा येथे ही भयंकर घटना घडली. बुधवारी या घटनेचे सीसीटीव्ही समोर आलं. तरुणाला कोणताही आजार नव्हता असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या मुलाचं नाव हंजला असं असून वय २० वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. हंजला हा एका व्यापाऱ्याचा मुलगा होता.
एक और युवक की हार्ट अटैक से मौत! बाइक पर जा रहे युवक को आया हार्ट अटैक! लोगों ने CPR देकर जान बचाने की कोशिश! युवक की मौत! CCTV कैमरे में कैद हुई घटना! मामला यूपी के मुरादाबाद का!#UttarPradeshnews#moradabadnews#heartattack#livedeathpic.twitter.com/3FslczQw3x
— Arun Kumar (@ArunKum96527953) April 23, 2025
सोमवारी दुपारी हंजला त्याच्या बुलेटने घराबाहेर पडला होता. तो कारागिरांकडून पैसे गोळा करणार होता. दुपारी ३:३१ वाजता, तो त्याच्या बुलेटवरून पाचपेडा परिसरातील मशिदीजवळ पोहोचला, अचानक तो थरथरायला लागला. हंजलाने बुलेटवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्याची बुलेट पुढे गेली आणि एका खांबाजवळ उभ्या असलेल्या दुसऱ्या बाईकवर पडली.
तो तिथेच वेदनेने तडफडत लागला. मागून येणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीने त्याला पाहिलं आणि मदतीसाठी धावत गेला आणि बुलेटवर असलेल्या हंजला सावरण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर इतर स्थानिक लोकही घटनास्थळी पोहोचले आणि त्याला मदत करू लागले, तेव्हा एक तरुण पाणी घेऊन आला आणि त्याच्यावर पाणी शिंपडण्यात आलं.
मदतीसाठी आलेल्या लोकांनी हंजला बेशुद्ध होताच त्याला सीपीआर दिला. पण काहीच हालचाल झाली नाही. हंजलाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. डॉक्टरांनी मृत्यूचं कारण हार्ट अटॅक असल्याचं सांगितं आहे. त्याला दोन लहान बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.