Gujarat Bridge Collapsed : डेथ ब्रिज! भाजपा खासदार मोहन कुंदारियांवर दु:खाचा डोंगर कोसळला; कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 11:24 AM2022-10-31T11:24:06+5:302022-10-31T11:30:10+5:30

Gujarat Bridge Collapsed : भाजपा खासदाराच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

morbi bridge collapse 12 members of bjp mp from rajkot mohanbhai kalyanji kundaria family killed | Gujarat Bridge Collapsed : डेथ ब्रिज! भाजपा खासदार मोहन कुंदारियांवर दु:खाचा डोंगर कोसळला; कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू

Gujarat Bridge Collapsed : डेथ ब्रिज! भाजपा खासदार मोहन कुंदारियांवर दु:खाचा डोंगर कोसळला; कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू

googlenewsNext

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील केबल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  पुलावरील ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. याच दरम्यान भाजपा खासदाराच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

मोहन कुंदारिया हे भाजपाचे राजकोटमधील खासदार आहेत. कुंदारिया यांच्या नातेवाईकांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. कुंदरिया यांच्या 12 नातेवाईकांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला असून यामध्ये  बहिणीच्या सासरच्या मंडळींचा समावेश आहे. “या पूल दुर्घटनेत मी 5 मुलांसह माझ्या कुटुंबातील 12 सदस्य गमावले आहेत. तसेच, मी माझ्या बहिणीच्या कुटुंबातील सदस्य गमावले आहेत” असं कुंदारिया यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. 

“काही लोक मुद्दाम पूल हलवत होते...”; दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबाने सांगितलं काय घडलं?

भीषण पूल दुर्घटनेतून अहमदाबादचे रहिवासी विजय गोस्वामी आणि त्यांचे कुटुंबीय सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत. विजय यांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. गोस्वामी हे कुटुंबियांसोबत पर्यटनासाठी गेले होते. यावेळी काही तरुण हा पूल मुद्दाम हलवत असल्याचं त्यांना दिसून आले. पुढचा धोका लक्षात घेता ते या पुलावरुन अर्ध्यातूनच माघारी फिरले. त्यानंतर अवघ्या काही तासातच हा पूल मच्छू नदीत कोसळला. विजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, "काही तरुणांकडून हा पूल मुद्दाम हलवला जात असताना नागरिकांना चालणं देखील अवघड झालं होतं. याबाबत पूल कर्मचाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र त्यांनी कारवाई केली नाही." 

"पूल कर्मचाऱ्यांना परिसरातून निघण्यापूर्वी सतर्क केले होतं”

"मी पूल कर्मचाऱ्यांना या परिसरातून निघण्यापूर्वी सतर्क केलं होतं. हा पूल हलवण्यापासून लोकांना थांबवा, असंही सांगितले होतं. मात्र त्यांचा रस केवळ तिकीट विक्रीमध्ये होता. गर्दी नियंत्रित करण्यासाठी त्यांच्याकडे व्यवस्थाच उपलब्ध नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले" अशी माहितीही विजय गोस्वामी यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी या पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या एजन्सीविरोधात ३०४, ३०८ आणि ११४ या कलमांतर्गत क्रिमिनल केस दाखल करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी तपासही सुरू करण्यात आलाय.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: morbi bridge collapse 12 members of bjp mp from rajkot mohanbhai kalyanji kundaria family killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.