मोर्चा झाला; आता होणार रस्ता रोको! सोलापूर बंद संमिर्श : जिल्हाधिकार्‍यांवर पुन्हा संताप व्यक्त

By admin | Published: December 8, 2015 01:51 AM2015-12-08T01:51:58+5:302015-12-08T01:51:58+5:30

सोलापूर : ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेसंदर्भातील देवस्थान पंचसमिती आणि जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे असून, आजच्या मोर्चानंतर कलेक्टर कचेरीच्या प्रवेशद्वारावर झालेल्या सभेत रस्ता रोको करण्याची पालकमंत्र्यांनीच हाक दिली आहे. जिल्हाधिकार्‍यांचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सिद्धेश्वरभक्त, राजकीय नेते, कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रमुख आणि यात्रेतील मानकर्‍यांची मोठी गर्दी होती; पण सोलापूर बंदला संमिर्श प्रतिसाद मिळाला.

Morcha happened; Stop the road going now! Convergence of Solapur: Expressing resentment over District Collector | मोर्चा झाला; आता होणार रस्ता रोको! सोलापूर बंद संमिर्श : जिल्हाधिकार्‍यांवर पुन्हा संताप व्यक्त

मोर्चा झाला; आता होणार रस्ता रोको! सोलापूर बंद संमिर्श : जिल्हाधिकार्‍यांवर पुन्हा संताप व्यक्त

Next
लापूर : ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेसंदर्भातील देवस्थान पंचसमिती आणि जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे असून, आजच्या मोर्चानंतर कलेक्टर कचेरीच्या प्रवेशद्वारावर झालेल्या सभेत रस्ता रोको करण्याची पालकमंत्र्यांनीच हाक दिली आहे. जिल्हाधिकार्‍यांचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सिद्धेश्वरभक्त, राजकीय नेते, कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रमुख आणि यात्रेतील मानकर्‍यांची मोठी गर्दी होती; पण सोलापूर बंदला संमिर्श प्रतिसाद मिळाला.
आपत्ती व्यवस्थापनाचे नियम पाळावेत, धुळीच्या नियंत्रणासाठी होम मैदानावर मॅटिंग करावे आणि नव्याने तयार केलेल्या आपत्कालीन रस्त्यावर दुकाने थाटू नयेत, अशी जिल्हाधिकार्‍यांनी भूमिका घेतल्यामुळे देवस्थान पंचसमितीने संघर्षाचा पवित्रा घेतला. या संघर्षात सिद्धेश्वरभक्तांना सामील करून घेण्यात पंचसमितीला यश आल्याचे आजच्या मोर्चावरून दिसून आले. सिद्धेश्वर देवस्थान पंचसमितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी मल्लिकार्जुन मंदिरापासून मोर्चा निघाला. सराफ बाजार, मधला मारुती, विजापूर वेस या प्रमुख परिसरातून मोर्चा मार्गस्थ होत असताना त्यात सहभागी होणार्‍या लोकांचीही संख्या वाढत गेली. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे स्वरूप वाढत गेले.
जिल्हाधिकार्‍यांच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आजच्या बंदला संमिर्श प्रतिसाद मिळाला. नवीपेठ, चाटी गल्ली, सराफ बाजार, कुंभार वेस, बाजार समिती आदी बाजारपेठा बंद असल्या तरी शहराचा हद्दवाढ भाग, पार्क चौक परिसर, जुना एम्प्लॉयमेंट चौक परिसर, सात रस्ता, मोदी भागातील व्यवहार सुरळीतपणे सुरू होते.

Web Title: Morcha happened; Stop the road going now! Convergence of Solapur: Expressing resentment over District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.