मुख्याध्यापकांचा पोलीस ठाण्यावर ी मोर्चा

By admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:51+5:302015-09-04T22:45:51+5:30

श्रीरामपूर : भोकर येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश मनुलाल पाटणी यांच्यावर दाखल करण्यात आलेला अदखलपात्र गुन्हा रद्द करून तोतया पत्रकाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन दिले.

The Morcha's head on the police station | मुख्याध्यापकांचा पोलीस ठाण्यावर ी मोर्चा

मुख्याध्यापकांचा पोलीस ठाण्यावर ी मोर्चा

Next
रीरामपूर : भोकर येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश मनुलाल पाटणी यांच्यावर दाखल करण्यात आलेला अदखलपात्र गुन्हा रद्द करून तोतया पत्रकाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन दिले.
पाटणी यांच्याविरूद्ध मोहन जगताप या तोतया पत्रकाराने खोटी फिर्याद दिली असून तिच्यावरील आरोप खोटे आहेत. शाळेत विनापरवाना घुसून सरकारी कामकाजात हस्तक्षेप करून खंडणी मागणार्‍या जगतापविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी मुख्याध्यापक व शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांनी केली. यावेळी माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत डावखर, माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष मुख्याध्यापक जाकीर शाह, सदिच्छा मंडळाचे जब्बार सय्यद, गुरूकुल मंडळाचे सलीमखान पठाण, भारत मुक्ती मोर्चाचे रमेश मकासरे, गुरूमाऊली मंडळाचे बाळासाहेब सरोदे, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक सुरेश तडके, माजी संचालक प्रल्हाद साळुंके, डी. एल. भोंगळे यांच्यासह प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने हजर होते. (प्रतिनिधी)

Web Title: The Morcha's head on the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.