तबलिगी जमातच्या 2 हजारहून अधिक परदेशी नागरिकांना 10 वर्षांसाठी भारत बंदी, ठेवण्यात आले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 05:36 PM2020-06-04T17:36:51+5:302020-06-04T17:56:10+5:30
यापूर्वी दिल्ली पोलिसांनी या परदेशी नागरिकांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. दिल्ली गुन्हे शाखेने सांगितल्यानुसार, या सर्वा आरोपींनी व्हिसा नियमांचे उल्लंघण केले होते.
नवी दिल्ली : तबलिगी जमातच्या कार्यात सहभागी झाल्याबद्दल 2,200हून अधिक परदेशी नागरिकांना भारतात येण्यावर बंदी घातलण्यात आली आहे. 10 वर्षांसाठी ही बंदी असेल. सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या परदेशी नागरिकांना यापूर्वीच ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी दिल्ली पोलिसांनी या परदेशी नागरिकांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. दिल्ली गुन्हे शाखेने सांगितल्यानुसार, या सर्वा आरोपींनी व्हिसा नियमांचे उल्लंघण केले होते. या मुळे सरकारने या सर्वांचे व्हिसा रद्द करून त्यांना काळ्या यादीतही टाकले होते. या आरोपींवर महामारी अधिनियम तोडल्याच्या आरोपासह इतर अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
#UPDATE More than 2,200 blacklisted foreign nationals banned for 10 years from travelling to India for their involvement in Tablighi Jamaat activities: Government Sources https://t.co/9b4t5QpkSt
— ANI (@ANI) June 4, 2020
संबंधित आरोप पत्रात आरोप करण्यात आला आहे, की यांनी देशात महामारी पसरवण्याचे कृत्य केले आहे. याला अनेक निरपराध लोक बळी पडले.
"कोरोना वाढतोय, तयार करावी लागतील 'मेक शिफ्ट' रुग्णालयं"; मोदी सरकारची सर्वोच्च न्यायालयात कबुली
या देशाचे आहेत नागरिक -
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅकलिस्ट करण्यात आलेले 2200 परदेशी जमातींमध्ये माली, नायजेरिया, श्रीलंका, केनिया, जिबूती, टांझानिया, दक्षिण, आफ्रिका, म्यानमार, थायलंड, बांगलादेश, यूके (OCI कार्ड धारक) ऑस्ट्रेलिया आणि नेपाळमधील नागरिकांचा समावेश आहे. यांना आता पुढील 10 वर्षांपर्यंत भारतात येता येणार नाही.
आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया