300 हून अधिक दहशतवादी पीओकेतून घुसण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 02:53 AM2020-05-21T02:53:38+5:302020-05-21T02:54:16+5:30

दिलबाग सिंग म्हणाले की, घुसखोरीसाठी दहशतवादी मोठ्या संख्येने जमले आहेत. राजौरी-पूंछ भागात त्यांनी केलेले असे दोन ते तीन प्रयत्न सैन्याने उधळून लावले आहेत.

More than 300 terrorists prepare to infiltrate POK | 300 हून अधिक दहशतवादी पीओकेतून घुसण्याच्या तयारीत

300 हून अधिक दहशतवादी पीओकेतून घुसण्याच्या तयारीत

Next

जम्मू : जगभर सध्या कोरोनाचा फैलाव झाला आहे. सगळे देश या संकटाचा सामना करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत; परंतु अशाही स्थितीत नियंत्रण रेषेपलीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये ३०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत; परंतु भारतीय जवान त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी सज्ज आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली.
दिलबाग सिंग म्हणाले की, घुसखोरीसाठी दहशतवादी मोठ्या संख्येने जमले आहेत. राजौरी-पूंछ भागात त्यांनी केलेले असे दोन ते तीन प्रयत्न सैन्याने उधळून लावले आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय आणि इतर दहशतवादी एजन्सींचा यात सहभाग आहे. दहशतवादी तळांवर अनेक दहशतवादी तयार आहेत. विविध यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा ३०० च्या आसपास आहे.

जम्मू-काश्मीरच्या अंतर्गत भागात
240
हून अधिक दहशतवादी सक्रिय असू शकतात. आतापर्यंत केलेल्या कारवाईत आम्ही
70
हून अतिरेक्यांचा खात्मा केला आहे.
21
कमांडर त्यात या संघटनांचे मारले गेले आहेत, अशी माहिती सिंग यांनी दिली.

‘लष्कर’चे चार अतिरेकी अटकेत
श्रीनगर : लष्कर-ए-तोयबाच्या चार अतिरेक्यांना जम्मू आणि काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात बुधवारी अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. मुजफ्फर अहमद दार, मुदासिर अहमद लोने, युनिस वाझा (सर्व रा. बुद्रान) आणि नाझीर अहमद शेख (रा. पोष्कर खाग) अशी त्यांची नावे आहेत. पिस्टल, ग्रेनेडसह शस्त्रे, दारुगोळा व अन्य साहित्य जप्त केले गेले. हे अतिरेकी लश्कर-ए- तोयबाच्या दहशतवादी कारवायांना मदत करत होते. शिवाय ते बेकायदा कारवायांतही सहभागी असत.

पाककडून पुन्हा तोफमारा
जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील दोन सेक्टर्समध्ये पाकिस्तानच्या लष्कराने बुधवारी गोळीबार करून जोरदार तोफमारा केला. भारतीय लष्करानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने गोळीबार आणि तोफमारा करण्याचा हा सलग पाचवा दिवस होता. बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास पाकिस्तानने कोणतेही कारण नसताना नियंत्रण रेषेवरील किरनी आणि देगवार सेक्टर्समध्ये छोट्या शस्त्रांतून गोळीबार आणि उखळी तोफांतून मारा केला, असे प्रवक्त्याने सांगितले. पाकिस्तानकडून झालेल्या या माऱ्यात जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

300
हून अधिक
दहशतवादी पीओकेतून घुसण्याच्या तयारीत

Web Title: More than 300 terrorists prepare to infiltrate POK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.