'या' देशांमध्ये झाले 50% पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण, भारतात किती ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 03:05 PM2021-07-15T15:05:29+5:302021-07-15T15:05:52+5:30

Vaccination in world: लसीकरणाच्या बाबतीत संयुक्त अरब अमीरत(UAE)सर्वात पुढे आहे.

More than 50% of citizens were vaccinated in many countries, know how much in India? | 'या' देशांमध्ये झाले 50% पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण, भारतात किती ?

'या' देशांमध्ये झाले 50% पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण, भारतात किती ?

Next
ठळक मुद्देभारतात आतापर्यंत 39 कोटी नागरिकांचे लसीकरण

नवी दिल्ली: कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जगभर लसीकरण अभियान मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहे. या अभियानांतर्गत अनेक देश आपल्या कोट्यवधी नागरिकांना लसीचा पुरवठा करत आहे. विशेष म्हणजे अनेक देशांनी आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येला लसीचा कमीत-कमी एक डोस दिला आहे. लसीकरणाच्या बाबतीत संयुक्त अरब अमीरत(UAE)सर्वात पुढे आहे. तर, दुसऱ्या नंबरवर कॅनडा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमीरातने आपल्या 76% नागरिकांना लस दिली आहे. यातील काहींना एक तर काहींना दोन्ही डोस मिळाले आहेत. यूएईनंतर दुसर्या नंबरवर कॅनाडा आहे. त्यांनी आपल्या देशातील 69% नागरिकांचे लसीकरण केले आहे. कॅनाडानंतर चिली 69%, ब्रिटन 68%, सिंगापुर 68%, बहरीन 66%, बेल्जियम 66% नागरिकांना लसीचा कमीत-कमी एक डोस मिळाला आहे.

या देशात 50% पेक्षा जास्त लसीकरण
लसीकरणाच्या बाबतील वरील देशांसह नीदरलँड्स (66%) कतर (65%), इस्रायल (63%), पुर्तगाल (61%), इटली(59%), स्पेन(59%), जर्मनी(58%), ऑस्ट्रिया(57%), हंगरी(56%), अमेरिका(56%), आयरलैंड(56%), स्वीडन(55%), फ्रांस(53%), स्विट्जरलैंड(52%), सऊदी अरब (52%) सामील आहेत. या देशांनी आपल्या 50% पेक्षा जास्त नागरिकांना लसीचा कमीत-कमी एक डोस दिला आहे. 

भारतात 39 कोटी नागरिकांचे लसीकरण
भारतात आतापर्यंत 39 कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकण झाले आहे. यातील 31 कोटी नागरिकांना लसीचा पहिला, तर 8 कोटी नागरिकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. लसीकरणामध्ये उत्तर प्रदेश भारतात सर्वात पुढे आहे. यूपीमध्ये आतापर्यंत 3 कोटी 88 लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
 

Web Title: More than 50% of citizens were vaccinated in many countries, know how much in India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.