चारशेहून अधिक भारतीय मायदेशी; मायभूमीवर पाय ठेवताच केला जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 06:05 AM2021-08-23T06:05:10+5:302021-08-23T06:05:35+5:30

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांची चिंता वाढली होती. तालिबानने भारतीयांवर हल्ला करणार नसल्याचे जाहीर केले असले तरीही भीती  होती.

More than four hundred Indian natives; As soon as he set foot on india, they shouted | चारशेहून अधिक भारतीय मायदेशी; मायभूमीवर पाय ठेवताच केला जयघोष

चारशेहून अधिक भारतीय मायदेशी; मायभूमीवर पाय ठेवताच केला जयघोष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अफगाणिस्तानातील  तणावग्रस्त परिस्थितीत वायुसेनेच्या विशेष विमानांमधून सुमारे ४०० भारतीयांना मायदेशी परत आणण्यात यश आले आहे. भारतीयांसह काही अफगाण नागरिकांना घेऊन वायुसेनेची विमाने गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर उतरली. भूमीवर पाय ठेवताच भाारतीयांनी ‘भारतमाता की जय’ अशा घोषणाही दिल्या. 

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या भारतीयांची चिंता वाढली होती. तालिबानने भारतीयांवर हल्ला करणार नसल्याचे जाहीर केले असले तरीही भीती  होती. सुमारे २०० शीख आणि हिंदू नागरिक एका गुरुद्वारामध्ये थांबले होते. अखेर वायुसेनेच्या विशेष विमानांमधून त्यांना भारतात आणण्यात आले. तीन विमानांमधून ३२९ भारतीय आणि अफगाणिस्तानच्या दोन खासदारांसह जवळपास ४०० जणांना भारतात आणण्यात आले.. याशिवाय अमेरिका आणि नाटोच्या विमानांमधून दोहा येथे गेलेल्या १३५ भारतीयांनाही परत आणण्यात आल्याची माहिती वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दोहा येथून भारतात आलेल्या नागरिकांमध्ये बहुतांश जण हे विविध परदेशी कंपन्यांचे कर्मचारी आहेत. कतार, ताजिकिस्तान, अमेरिका व इतर मित्र राष्ट्रांच्या मदतीने भारत ही मोहीम राबवीत आहे.

अफगाण महिलेने मानले आभार
भारतात दाखल झालेल्या अफगाण नागरिकांनी भारताचे आभार मानले आहेत. एका महिलेने सांगितले की, तालिबान्यांनी माझे घर जाळले. त्यामुळे मी, माझी मुलगी आणि दोन नातवंडे येथे आलो आहोत. या कठीण प्रसंगात आमचे भारतीय बंधू आणि भगिनी आमच्या मदतीला आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.

अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला सुरक्षितपणे भारतात परत आणण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या नागरिकांची नेमकी ठिकाणे शोधण्याचे आव्हान आहे. त्यामुळे भारतीयांनी तसेच त्यांना नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांनी माहिती पुरविण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. 
nभारतीयांसोबत अनेक अफगाण नागरिकही भारतात दाखल होत आहेत. 

Web Title: More than four hundred Indian natives; As soon as he set foot on india, they shouted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.