चारपेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास होणार १५० रुपयांचा भुर्दंड
By admin | Published: March 1, 2017 11:21 PM2017-03-01T23:21:36+5:302017-03-02T12:17:50+5:30
एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक आदी बँकांनी बुधवारपासून एका महिन्यात चारहून अधिक व्यवहारांवर (पैशांचा भरणा किंवा ते काढणे)
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 01 - एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक आदी बँकांनी बुधवारपासून एका महिन्यात चारहून अधिक व्यवहारांवर (पैशांचा भरणा किंवा ते काढणे) प्रति व्यवहार १५० रुपये शुल्क आकारणी सुरू केली आहे. हे शुल्क बचत त्याचप्रमाणे वेतन खात्यांनाही लागू असेल, असे एचडीएफसीच्या एका परिपत्रकात म्हटले आहे. या परिपत्रकानुसार, एचडीएफसी बँकेने तिसऱ्या पक्षासाठी व्यवहाराची मर्यादा प्रति दिन २५ हजार एवढी निश्चित केली असून, रोख हाताळणी शुल्क मागे घेतले आहे. लोकांना रोख व्यवहारापासून परावृत्त करून डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी उचललेले पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे. शून्य जमा असणाऱ्या खात्यांसाठी कमाल चार वेळा नि:शुल्क पैसे काढण्याची मर्यादा कायम ठेवली असून, रोख भरण्यावर त्यांना कोणतेही शुल्क लागणार नाही. आयसीआयसीआय बँकेचे नोटाबंदीपूर्वी जे शुल्क होते तेच राहणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटनुसार, मूळ शाखेत (जेथे खातेधारकाचे खाते आहे.) एका महिन्यात चार देवाण-घेवाणीवर (पैसे भरणे आणि काढणे ) कोणतेही शुल्क लागणार नाही. त्यानंतर दर हजाराला पाच रुपयांचे शुल्क लागेल. त्या महिन्यात असे किमान १५० रुपयांचे शुल्क आकारले जाईल. मूळ शाखा नसलेल्या शाखेत करण्यात आलेल्या पहिल्या व्यवहाराला आयसीआयसीआय बँक कोणतेही शुल्क आकारणार नाही. तथापि, त्या महिन्यातील त्यानंतरच्या अशा व्यवहाराला दर हजाराला पाच रुपये शुल्क आकारले जाईल. यासाठी किमान शुल्क १५० रुपये ठेवण्यात आले आहे. कुठेही रोख भरणा करण्यासाठी आयसीआयसीआय बँक प्रति हजार ५ रुपये (किमान १५० रुपये) शुक्ल आकारेल. रोकड स्वीकारणाऱ्या मशीनमध्ये एका महिन्यातील पहिला भरणा नि:शुल्क असेल. त्यानंतर १ हजार रुपयांसाठी ५ रुपये शुल्क लागेल. अॅक्सिस बँकेतही पहिले पाच व्यवहार किंवा दहा लाख रुपयांपर्यंतची देवाण-घेवाण नि:शुल्क असेल. त्यानंतर प्रति एक हजार रुपयांवर ५ रुपये किंवा १५० रुपये यापेक्षा जे अधिक असेल तेव्हढे शुल्क आकारले जाईल. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही असेच पाऊल उचलले किंवा काय हे लगेच समजू शकले नाही. याबाबत संपर्क साधल्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सरकारकडून याबाबत बँकांना कोणतेही निर्देश मिळाले नसल्याचे सांगितले
#HDFC Bank, #ICICI Bank and others start charging for cash transactions; Rs 150 minimum charge after 4 free transactions a month.
— Press Trust of India (@PTI_News) March 1, 2017
#HDFCBank caps third-party cash transactions at Rs 25,000 a day.
— Press Trust of India (@PTI_News) March 1, 2017