देश परदेश पानावर न गेलेल्या आणखी बातम्या

By Admin | Published: January 6, 2016 01:51 AM2016-01-06T01:51:05+5:302016-01-06T01:51:05+5:30

देश परदेश पानावर न गेलेल्या आणखी बातम्या .............मोदींच्या लाहोरडिप्लोमसीवर सेनेचा प्रहारपठाणकोट हल्ला : काँग्रेस- भाजपमध्ये जुंपले वाक्युद्धनवी दिल्ली/ मुंबई ...

More news on the country's foreign land | देश परदेश पानावर न गेलेल्या आणखी बातम्या

देश परदेश पानावर न गेलेल्या आणखी बातम्या

googlenewsNext
>देश परदेश पानावर न गेलेल्या आणखी बातम्या
.............

मोदींच्या लाहोर
डिप्लोमसीवर सेनेचा प्रहार
पठाणकोट हल्ला : काँग्रेस- भाजपमध्ये जुंपले वाक्युद्ध
नवी दिल्ली/ मुंबई : पठाणकोटच्या हवाई तळावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाहोर डिप्लोमसीवर सडकून टीका केली आहे. पाकिस्तान धोरणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वाक्युद्ध छेडले गेले असताना शिवेसेनेने मोदींनी संपूर्ण जगात एकजूट घडविण्याऐवजी केवळ भारतावरच लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला दिला आहे.
नवाज शरीफ यांनी एक कप चहाच्या बदल्यात आपल्या सात जवानांचे प्राण घेतले आहे. मोदींनी पाकिस्तानवर विश्वास ठेवू नये, असा इशाराही या पक्षाने दिला. २५ डिसेंबर रोजी मोदींनी पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना अकस्मात लाहोरला भेट देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
मोदी हे गेल्याच आठवड्यात शरीफ यांचे पाहुणे बनले होते. त्यावेळी आम्ही त्यांना पाकिस्तानवर विश्वास ठेवू नका असा इशारा दिला होता. आता आपला कसा विश्वासघात झाला हे सर्वांना दिसतेच आहे, असे शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध लेखात म्हटले आहे.(वृत्तसंस्था)
-----------
आता धोरण कसे बदलले ? - काँग्रेसचा सवाल
काँग्रेस आज सत्तेवर असती तर पाकिस्तानवर हल्ले करीत जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्याची मागणी झाली असती. आता पठाणकोटवर हल्ला झाला असताना तसे काहीही होत नाहीय. टिष्ट्वटरवर शहिदांच्या मृत्यूबद्दल शोकसंवेदना व्यक्त करण्याचे एकमेव काम केले जात आहे. मोदींनी अकस्मात पाकिस्तानला भेट देताना त्या देशाकडून असे कोणते आश्वासन मिळविले होते, असा सवाल करीत काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी हल्लाबोल केला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंगांनी शक्यतांऐवजी निष्पत्तींना प्राधान्य दिले होते. सध्याच्या सरकारने धोरणात बदल करीत केवळ शक्यतांना महत्त्व दिले आहे. लाहोरमध्ये केवळ संभाव्य बाबींवर चर्चा झाली होती. मोदींनी चर्चेची निष्पत्ती काय राहिली ते सांगायला हवे. आम्ही चर्चा घडवून आणण्याचे समर्थन करतो, मात्र त्याचवेळी देशाची सुरक्षा आणि अखंडतेशी तडजोड केली जाऊ नये असेच आम्हाला स्पष्टपणे सांगायचे आहे, असे शर्मा यांनी दिल्लीत पत्रपरिषदेत म्हटले.
------------------------
काँग्रेसचे विधान लाजिरवाणे- भाजप
पठाणकोट हल्ल्यावरून काँग्रेसने चालविलेली विधाने लाजिरवाणी असून त्यामुळे देशविरोधी मानसिकता असलेल्या घटकांच्या नैतिक धैर्याला बळकटीच दिली जाते, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटले. काँग्रेसने दहशतवाद्यांच्या कृत्याबद्दल सवाल न करता दहशतवाद मिटवण्यासाठी लढणाऱ्या सरकारला घेरले आहे. या पक्षाने जनतेच्या संवेदनांकडे डोळेझाक करीत आपल्या जवानांच्या हौतात्म्याबाबत प्रश्न उपस्थित करून मर्यादा ओलांडल्या आहेत. देशाची दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न करणे ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे देशविरोधी घटकांचे मनोधैर्य उंचावण्यास मदतच होईल, असेही ते म्हणाले.
...........
प्रतिक्रिया जोड/ मोदींनी देशाची माफी मागावी- जेडीयू

पठाणकोट येथील हल्ला ही केंद्र सरकारच्या गंभीर चुकीची परिणती असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी जेडीयूचे प्रवक्ते राजीवरंजन प्रसाद यांनी केली आहे. देशातील सुरक्षा आणि जवानांचे मनोबळ उंचावण्याबाबत केंद्र सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला धक्का बसला आहे. देशाचे गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि विदेशमंत्र्याला चुकीची माहिती देण्याचा कायदेशीर अधिकार बहाल करण्यात आला काय? असा टोलाही त्यांनी हाणला.
..........

Web Title: More news on the country's foreign land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.