नऊ हजारांपेक्षा अधिक बालगृहांची होणार तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 04:25 AM2018-08-09T04:25:24+5:302018-08-09T04:25:38+5:30
बालगृहांची तपासणी करुन अहवाल ६० दिवसांत देण्याचे आदेश केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने दिले आहेत.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश व बिहारमध्ये बालिकागृहांतील मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर देशातील ९ हजारांपेक्षा अधिक बालगृहांची तपासणी करुन अहवाल ६० दिवसांत देण्याचे आदेश केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने दिले आहेत.
यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडे बालगृहांची तपासणी करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. या बालगृहांमध्ये मुले कोणत्या स्थितीत राहात आहेत, बालगृहे चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थेची पार्श्वभूमी काय आहे हे बारकाईने तपासले जाईल. देशामध्ये नोंदणीकृत ९,४६२ बालगृहे आहेत. ही चालविण्याची जबाबदारी राज्ये स्वयंसेवी संस्थेकडे सोपवते. रोज पहाटे उठा, तीनदा झाडलोट करा, अशी सक्ती देवरिया येथील बालगृहात राहाणाºया मुलींवर तेथील व्यवस्थापकगिरिजा त्रिपाठीकडून करण्यात येत होती. या बदल्यात त्या मुलींना दोन वेळचे जेवण दिले जाई.