500 रुपयांच्या जास्त नोटा वितरणात येणार - अरुण जेटली
By admin | Published: December 29, 2016 04:30 PM2016-12-29T16:30:03+5:302016-12-29T16:30:03+5:30
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठ्या प्रमाणात चलन बाजारात आधीपासूनच उपलब्ध करून दिले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठ्या प्रमाणात चलन बाजारात आधीपासूनच उपलब्ध करून दिले आहे. जुने चलन मोठ्या स्वरूपात बदलून देण्यात आलं असून, 500च्या नव्या नोटाही मागणीनुसार बाजारात उपलब्ध आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले आहेत. यावेळी जेटलींनी नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा देणा-या लोकांचे आभारही मानले आहेत.
नोटाबंदीमुळे कोणतीही अशांतता पसरली नाही. उलट त्याचा फायदा होऊन टॅक्स वसुलीत मोठी वाढ झाली आहे. सरकारच्या सर्व विभागांच्या करामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत केंद्रीय अप्रत्यक्ष करात 26.2 टक्क्यांची वाढ झाली असून, त्यात 43.5 टक्क्यांमध्ये अबकारी कराचाही समावेश आहे. सेवा कर 25.7 टक्के, तर सीमाशुल्क 5.6 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढत्या सकल प्रत्यक्ष करवसुलीत 14.4 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, विकास दरही 8.3 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, अशी माहिती यावेळी अरुण जेटली यांनी दिली आहे.
Gross direct tax collections growing at a rate of 14.4% over last year. This growth rate was only 8.3% previous year: FM Jaitley
— ANI (@ANI_news) 29 December 2016